झुकरबर्गने कौतुक केलेल्या आयटी तज्ज्ञाची नाशकात आत्महत्या

झुकरबर्गने कौतुक केलेल्या आयटी तज्ज्ञाची नाशकात आत्महत्या

नाशिक : नाशिकमध्ये प्रसिद्ध आयटी तज्ज्ञ कौशल बाग या विद्यार्थ्यानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांनी कौशलचं कौतुक केल्यामुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला होता. मात्र अचानक त्याने टोकाचं पाऊल उचलल्याने सर्वांना मोठा धक्का बसला आहे.

नाशिकच्या अशोका मार्ग परिसरातील अॅपल ईट सोसायटीमध्ये दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कौशलने गळफास घेतला. त्याचा भाऊ घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. कौशलच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

कौशल बाग नाशिकच्या के. के. वाघ कॉलेजमध्ये आयटीचं शिक्षण घेत होता. नाशिक कुंभमेळ्याच्या वेळी हेल्पिंग हॅंड्स नावाचं मोबाईल अॅप त्याने तयार केलं होतं. हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी हे अॅप उपयुक्त ठरत होतं. या कार्यामुळे नाशिकचे पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी कौशलचा जाहीर सत्कारही केला होता.

नाशिक पोलिस आयुक्तालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पोलिस मॅरेथॉनचं ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून कौशलने फेसबुक लाईव्ह केलं होतं. त्याबद्दल मार्क झुकरबर्गनंही कौशलचं कौतुक केलं होतं. कौशलच्या अचानक जाण्यानं कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

First Published:

Related Stories

मालेगाव निवडणुकीत एकाच कुटुंबातील MIMचे तिघंही विजयी
मालेगाव निवडणुकीत एकाच कुटुंबातील MIMचे तिघंही विजयी

मालेगाव : मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत एमआयएमने जोरात मुसंडी

हत्येचा कट रचल्याप्रकरणी भाजप नगरसेवक हेमंत शेट्टीला अटक
हत्येचा कट रचल्याप्रकरणी भाजप नगरसेवक हेमंत शेट्टीला अटक

नाशिक: नाशिकमधील भाजपचे नगरसेवक हेमंत शेट्टी यांना काल (शुक्रवार)

हत्येचा बदला घ्यायला आले, मात्र जीव घेतला दुसऱ्याचाच!
हत्येचा बदला घ्यायला आले, मात्र जीव घेतला दुसऱ्याचाच!

नाशिक : नाशिकमध्ये दहावीत शिकणाऱ्या 16 वर्षीय तुषार साबळे नावाच्या

मालेगाव महापालिकेचा प्रभागनिहाय निकाल
मालेगाव महापालिकेचा प्रभागनिहाय निकाल

मालेगाव : मालेगाव महापालिका निवडणूक निकालांमध्ये कोणत्याही

शाहरुखच्या भेटीसाठी नाशकातील सहा बहिणींचं घरातून पलायन
शाहरुखच्या भेटीसाठी नाशकातील सहा बहिणींचं घरातून पलायन

नाशिक : बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या क्रेझी फॅन्सची संख्या काही

दाऊदच्या नातेवाईकाचं लग्न, दावतला गिरीष महाजनांची हजेरी
दाऊदच्या नातेवाईकाचं लग्न, दावतला गिरीष महाजनांची हजेरी

नाशिक: दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नाला उपस्थित राहिल्याबद्दल

नाशिकमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या देहविक्रीचा पर्दाफाश
नाशिकमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या देहविक्रीचा...

नाशिक : नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसर म्हणून ओळख असणाऱ्या

दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नाला नाशकात 8 पोलिसांची हजेरी
दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नाला नाशकात 8 पोलिसांची हजेरी

नाशिक : नाशकातले आठ पोलिस अधिकारी एका लग्न सोहळ्यामुळे अडचणीत

अनैतिक संबंधातून महिलेची हत्या, मृतदेह पाच दिवसांपासून घरात
अनैतिक संबंधातून महिलेची हत्या, मृतदेह पाच दिवसांपासून घरात

नाशिक : नाशकात अनैतिक संबंधातून महिलेची हत्या करणाऱ्या आरोपीला

नाशकात बाप्पाला उष्णतेपासून वाचवण्यासाठी चंदनाचा लेप
नाशकात बाप्पाला उष्णतेपासून वाचवण्यासाठी चंदनाचा लेप

नाशिक : उन्हाच्या काहिलीपासून स्वतःचं संरक्षण करताना नाशिककर