तब्बल 11 दिवसांनी लासलगाव कांदा बाजारपेठ सुरु होणार

तब्बल 11 दिवसांनी लासलगाव कांदा बाजारपेठ सुरु होणार

नाशिक : शेतकऱ्याच्या आंदोलनामुळे गेल्या 11 दिवसांपासून शुकशुकाट पसरलेल्या लासलगाव बाजारसमितीमधील कारभार आजपासून पूर्वपदावर येणार आहे. गेल्या 11 दिवसांपासून लासलगाव बाजारसमिती बंद असल्यानं शेतकऱ्यांसोबतच व्यापाऱ्यांचही मोठं नुकसान झालं. दरम्यान आजपासून लासलगाव बाजारसमितीत पुन्हा एकदा कांदा आणि धान्याचा लिलाव सुरु होणार आहे. त्यामुळे आता हळू-हळू बाजार समित्यांमधील कारभार पूर्वपदावर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काल रविवारी सुकाणू समिती आणि उच्चाधिकार मंत्रिगटाच्या झालेल्या बैठकीत सरसकट कर्जमाफीला तत्वत: मान्यता देण्यात आली. कर्जमाफीसाठी 26 जुलैचं अल्टिमेटम सरकारला देण्यात आलं. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन तुर्तास थांबवलं आहे.

शेतकरी संपामुळे आशियातली सर्वात मोठी कांदा बाजार समिती असलेली लासलगाव बाजार समिती ओस पडली होती. दररोज होणारी हजारो क्विंटल कांद्याची आवक आणि करोडो रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती.

एकट्या नाशिक जिल्ह्यात संपामुळे 100 कोटींपेक्षा जास्तची उलाढाल थांबली होती. शेतकरीच नाही तर हमाल, मापारी, वाहनचालकांची रोजंदारी या काळात बुडाली.

जिल्ह्यातल्या 17 मोठ्या बाजार समित्या आणि 20 उपबाजार समित्यांमध्ये रोज होणारा 20 ते 25 कोटींचा भाजीपाला, कांदे व्यापार ठप्प झाला होता.

First Published:

Related Stories

कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक, पण समाधानकारक नाही : उद्धव ठाकरे
कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक, पण समाधानकारक नाही : उद्धव ठाकरे

नाशिक :  शेतकरी कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक आहे. मात्र समाधानकारक

वैतरणा धरणात मासेमारीवर बंदी, जलसंपदा विभागाची कारवाई
वैतरणा धरणात मासेमारीवर बंदी, जलसंपदा विभागाची कारवाई

नाशिक : सव्वा कोटी मुंबईकरांच्या पाण्यात विष कालवणाऱ्यांच दुकान

नाशिकमध्ये पावसाची दमदार बॅटिंग, 24 तासात 45.6 मिलीमीटर पावसाची नोंद
नाशिकमध्ये पावसाची दमदार बॅटिंग, 24 तासात 45.6 मिलीमीटर पावसाची नोंद

नाशिक : नाशिक जिल्ह्यात सर्वत्र पावसाची दमदार बॅटिंग सुरु

वैतरणा धरणात औषध फवारणाऱ्यांची तात्काळ चौकशी : गिरीश महाजन
वैतरणा धरणात औषध फवारणाऱ्यांची तात्काळ चौकशी : गिरीश महाजन

नाशिक : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या वैतरणा धरणात औषधांची फवारी

नाशिकचे सायकल वारकरी पंढरपूरकडे
नाशिकचे सायकल वारकरी पंढरपूरकडे

नाशिक: विठू नामाचा जयघोष करत नाशिकमधून आज शेकडो वारकरी चक्क

रितेशच्या सिनेमात भूमिकेचं आमिष, ठकसेनाकडून 9 लाखांचा गंडा
रितेशच्या सिनेमात भूमिकेचं आमिष, ठकसेनाकडून 9 लाखांचा गंडा

नाशिक : सिनेमात काम मिळवून देण्याच्या आमिषानं अनेकांना गंडवणाऱ्या

नाशिकमध्ये अवैध मच्छिमारांची  वैतरणात औषध फवारणी, मुंबईकरांच्या जीवाशी खेळ
नाशिकमध्ये अवैध मच्छिमारांची वैतरणात औषध फवारणी, मुंबईकरांच्या...

नाशिक : मुंबईला पाणी पुरवणाऱ्या नाशिक जिल्ह्यातल्या वैतरणा

मॉलमधील चेंजिंग रुमला 'व्हर्च्युअल ड्रेसिंग रुम'चा पर्याय
मॉलमधील चेंजिंग रुमला 'व्हर्च्युअल ड्रेसिंग रुम'चा पर्याय

नाशिक : नाशिकच्या संघवी कॉलेजमधील कॉम्प्युटर इंजिनीयरिंगच शिक्षण

विजेची तार हातात धरुन नाशकात शेतकऱ्याची आत्महत्या
विजेची तार हातात धरुन नाशकात शेतकऱ्याची आत्महत्या

मनमाड : कर्जाला कंटाळून विद्युत वितरण कंपनीच्या डीपीवर चढून हातात

गर्भवती लेकीची हत्या करणाऱ्या बापाला फाशीची शिक्षा
गर्भवती लेकीची हत्या करणाऱ्या बापाला फाशीची शिक्षा

नाशिक : जातपंचाच्या दबावाला बळी पडून मुलीला संपवणाऱ्या बापाला