मालेगाव महापालिका निवडणुकीत भाजपकडून 45 मुस्लीम उमेदवारांना संधी

By: | Last Updated: > Thursday, 18 May 2017 5:14 PM
malegaon MNC election-2017 bjp gives ticket to 45 Muslim candidate

नाशिक : मालेगाव महापालिकेसाठी येत्या 24 मे रोजी मतदान होत असून, या निवडणुकीत 84 पैकी 77 जागांवर भाजपने आपले उमेदवार उतरवले आहेत. विशेष म्हणजे, यातील 45 उमेदवार हे मुस्लीम आहेत.

मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून, महापालिका जिंकण्यासाठी भाजपने निम्म्यापेक्षा अधिक जागांवर मुस्लीम उमेदवार दिले आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने अल्पसंख्याक समाजात मोदी लाट कितपत आहे? याची चाचपणी करण्यासाठी ही रणनिती तयार केली आहे.

भाजप शिवाय शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस-जनता दल (सेक्यूलर),  एमआयएम, आदी पक्षांनीही आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेत. या निवडणुकीसाठी शिवसेनेने 25 आणि एमआयएमने 37 प्रभागात आपले उमेदवार दिले आहेत.

काँग्रेसने 73 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेत. तर दुसरीकडे राष्ट्रावादी काँग्रेसने माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या जनता दल (सेक्यूलर)सोबत आघाडी करुन 66 उमेदवार उभे केलेत.

2012 च्या महापालिका निवडणुकीत भाजपने 24 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. पण या सर्वांचा पराभव झाला होता. तर 12 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती.

पण यंदा भाजपच्या तिकिटासाठी इच्छुकांनी मोठी रांग लावली होती. भाजपच्या तिकीटासाठी 248 जणांनी पक्षाच्या निरीक्षकांसमोर मुलाखती दिल्या होत्या. त्यातून भाजपने 77 जणांना संधी दिली असून, त्यातील 45 जण मुस्लीम उमेदवार आहेत.

First Published:

Related Stories

राष्ट्रीयत्व सिद्ध करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सेतू सुविधा केंद्रावर फेऱ्या
राष्ट्रीयत्व सिद्ध करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सेतू सुविधा...

उस्मानाबाद : विद्यार्थ्यांकडे असलेल्या आधारकार्डावर खरंतर

शाळेच्या पटांगणात झाड कोसळलं, 20 विद्यार्थी जखमी
शाळेच्या पटांगणात झाड कोसळलं, 20 विद्यार्थी जखमी

रायगड:  शाळेच्या पटांगणात झाड कोसळल्यामुळे 20 विद्यार्थी जखमी झाले

अकोला मनपात राडा, नगरसेवकाने सभागृहात डुक्कर आणलं
अकोला मनपात राडा, नगरसेवकाने सभागृहात डुक्कर आणलं

अकोला: खडाजंगीसाठी प्रसिद्ध असलेल्या अकोला महापालिकेत आज पुन्हा

उल्हासनगरमध्ये चिमुकला नदीत वाहून गेला!
उल्हासनगरमध्ये चिमुकला नदीत वाहून गेला!

उल्हासनगर : उल्हासनगरमधील वदोळ गावातला चिमुकला वालधुनी नदीत वाहून

पंढरपुरात वारकरी चिंतेत, ड्रेनेज फुटून चंद्रभागेचं वाळवंट दुषित
पंढरपुरात वारकरी चिंतेत, ड्रेनेज फुटून चंद्रभागेचं वाळवंट दुषित

पंढरपूर : विठूरायाच्या दारी भक्तांना घाणीच्या साम्राज्याला सामोरं

जिममध्ये व्यायाम करताना तरुणीचा मृत्यू
जिममध्ये व्यायाम करताना तरुणीचा मृत्यू

वसई : जिममध्ये व्यायाम करताना 30 वर्षाच्या तरुणीचा मृत्यू झाला आहे.

सदाभाऊ खोतांनी उडवली सुकाणू समितीची खिल्ली
सदाभाऊ खोतांनी उडवली सुकाणू समितीची खिल्ली

रायगड: रायगड जिल्ह्यातील एका कार्यक्रमात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ

मुंबईसह राज्यात पावसाचा जोर, 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज
मुंबईसह राज्यात पावसाचा जोर, 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई : मुंबईसह उपनगरात सकाळपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे.

कोल्हापूरमध्ये टोल कर्मचाऱ्यांची वाहन चालकाला मारहाण, चालक गंभीर
कोल्हापूरमध्ये टोल कर्मचाऱ्यांची वाहन चालकाला मारहाण, चालक गंभीर

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील किणी टोल नाक्यावर ट्रक चालकाने

मालेगावात सलमानच्या चाहत्यांनी थिएटरमध्येच फटाके फोडले!
मालेगावात सलमानच्या चाहत्यांनी थिएटरमध्येच फटाके फोडले!

मालेगाव : अभिनेता सलमान खानच्या ‘ट्युबलाईट’ सिनेमाचा शो सुरु