आंघोळ करताना शॉवरमधून करंट, डॉक्टरचा जागीच मृत्यू

डॉ. काकडे यांच्या अंगावर भाजलेल्याचे व्रण होते. मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. शॉक लागून मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात उघड झालं.

आंघोळ करताना शॉवरमधून करंट, डॉक्टरचा जागीच मृत्यू

नाशिक : आंघोळ करताना शॉवरमध्ये करंट उतरुन शॉक लागल्याने नाशिकमधील डॉक्टरचा मृत्यू झाला. डॉ. आशिष काकडे असे मृत डॉक्टरचे नाव आहे.

गंगापूर रोडवरील इंद्रप्रस्थ सोसायटीमध्ये राहणाऱ्या डॉ. आशिष काकडे यांच्या घरातून दुपारच्या सुमारास बाहेर पाणी येत असल्याचं सोसायटीतील रहिवाशांच्या लक्षात आलं. त्यांनी घरात जाऊन बघितले असता, डॉ. काकडे बाथरुममध्ये मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी सरकारवाडा पोलिसांना याबाबत माहिती दिली.

डॉ. काकडे यांच्या अंगावर भाजलेल्याचे व्रण होते. मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. शॉक लागून मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात उघड झालं.

डॉ. काकडे हे नाशिकच्या मोतिवाला महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून कार्यरत होते. मूळचे ते तळोदा येथील असून, तळोद्याला त्यांचे आई वडील दोघेही डॉक्टर आहेत.

नाशिक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Man electrocuted while taking shower in Nashik
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV