सप्तश्रुंगी गडावरुन उडी, विवाहितेची चिमुरडीसह आत्महत्या

नाशकातील निफाड तालुक्यात शिरवाडे वणीमध्ये राहणारी कांचन निफाडे आपल्या अडीच वर्षांच्या मुलीसह बेपत्ता होती.

सप्तश्रुंगी गडावरुन उडी, विवाहितेची चिमुरडीसह आत्महत्या

मनमाड : सप्तश्रुंगी गडाजवळ दरीमध्ये अडीच वर्षांच्या चिमुरडीसह एका विवाहितेचा मृतदेह आढळला आहे. गडाच्या शीतकड्यावरुन महिलेने लेकीसह उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

सप्तश्रुंगी गडावरुन दरीचे फोटो काढणाऱ्या भाविकांना या दोघींचे मृतदेह दिसले. त्यानंतर पोलिसांना या प्रकाराची माहिती देण्यात आली.

नाशकातील निफाड तालुक्यात शिरवाडे वणीमध्ये राहणारी कांचन निफाडे आपल्या अडीच वर्षांच्या मुलीसह मंगळवापासून बेपत्ता होती. मायलेकीचा शोध सुरु असतानाच भातोडे शिवारात त्यांचे मृतदेह आढळल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कांचनने शीतकड्यावरुन उडी घेतली असावी, असा अंदाज पोलिस वर्तवत असले तरी दोघींच्या मृत्यूमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.

नाशिक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Manmad : Lady allegedly committed suicide with daughter from Saptashrungi Gad
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV