पत्नीला मारलेल्या दगडाचा नेम चुकला, बहिणीचा जागीच मृत्यू

पत्नीला मारलेल्या दगडाचा नेम चुकला, बहिणीचा जागीच मृत्यू

मनमाड : पत्नीवर राग काढताना भावाने चुकून बहिणीचाच जीव घेतल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मनमाडच्या नांदगाव तालुक्यात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

पत्नीनं बहिणीला शेतातल्या कामाला आणल्यामुळे राजू मुकणे याचा पारा चढला. त्याने पत्नीवर राग काढण्यासाठी तिला दगड फेकून मारला. मात्र नेम चुकल्याने जिच्यावरील प्रेमापोटी भावाने दगड उचलला, त्या बहिणीलाच तो लागला.

हा निशाणा इतका जोरदार बसला, की बहिणीचा जागीच मृत्यू झाला. मूळ डोंगरीच्या इलम वस्तीतली ही घटना आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून आरोपी अद्याप मोकाट आहे.

नाशिक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV