आ. बच्चू कडूंनी नाशिक महापालिकेच्या आयुक्तांवरच हात उगारला!

आमदार बच्चू कडू आणि समर्थकांनी नाशिक महापालिकेत बराच गोंधळ घातला. अपंग पुनर्वसन कायदयाची अंमलबजावणी करत नसल्यानं बच्चू कडूंनी थेट आयुक्तांवरच हात उगारला.

आ. बच्चू कडूंनी नाशिक महापालिकेच्या आयुक्तांवरच हात उगारला!

नाशिक: आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या समर्थकांनी नाशिक महापालिकेत जोरदार गोंधळ घातल्याचं समोर आलं आहे. अपंग पुनर्वसन कायद्याची अंमलबजावणी झाली नसल्या कारणानं आयुक्त अभिषेक कृष्ण यांना घेराव घालण्यात आला होता. त्याचवेळी बाचाबाची झाल्यानं बच्चू कडू यांनी आयुक्तांवरच थेट हात उगारला.

नाशिक महापालिकेनं 1995 अपंग पुनर्वसन कायदा अद्याप अंमलात आणला नाही. तसेच अपंगांचा राखीव तीन टक्के निधी आजपर्यंत खर्च केला जात नसल्यामुळे मनपा मुख्यालयासमोर दुपारी बारा वाजेपासून प्रहार संघटनेच्या वतीनं धरणे आंदोलन सुरू आहे.

प्रहार संघटनेच्या या आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे आमदार बच्चू कडू यांनी शिष्टमंडळासमवेत महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या शाब्दिक वादानंतर कडू यांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट शिवीगाळ करत कृष्ण यांच्या अंगावर धावत जात हात उगारला. पण शिष्टमंडळाच्या कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांना वेळीच रोखले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

शरणपूर रोडवरील महापालिकेच्या राजीव गांधी भवन मुख्यालयासमोर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जोरदार घोषणाबाजीमुळे परिसरात सध्या तणाव आहे.

दरम्यान, याप्रकरणी बच्चू कडू यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त हरिभाऊ फडोळ यांनी दिली.

नाशिक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV