तिहेरी तलाक विधेयकाविरोधात मालेगावात मुस्लिम महिलांचा मोर्चा

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या नेतृत्वाखाली मुस्लिम महिलांनी हा मोर्चा काढला होता.

तिहेरी तलाक विधेयकाविरोधात मालेगावात मुस्लिम महिलांचा मोर्चा

 

मालेगाव : तिहेरी तलाक संदर्भातील विधेयक केंद्र सरकारने मागे घ्यावे, या मागणीसाठी मालेगावमध्ये मुस्लिम महिलांनी मूक मोर्चा काढला. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या नेतृत्वाखाली मुस्लिम महिलांनी हा मोर्चा काढला होता.

केंद्र सरकारकडून शरिया कायद्यात होत असलेल्या हस्तक्षेपाला आंदोलक महिलांनी तीव्र विरोध दर्शवला. शिवाय, तिहेरी तलाक संदर्भातील विधेयक सरकारने तात्काळ मागे घ्यावे ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.

ए.टी.टी. हायस्कूल येथून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात मोठ्या संख्येने मुस्लिम महिलांनी सहभाग घेतला होता. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या मोर्चाची सांगता करण्यात आली.

इस्लाम धर्मात स्त्री ही कुटुंबाच प्रतिनिधित्व करते, त्यामुळे तिला न्याय मिळवून देण्याच्या नावाखाली ईस्लामी कायद्यात सरकार ढवळाढवळ करत आहे. ही ढवळाढवळ सहन केली जाणार नाही, असं मत यावेळी मुस्लीम महिलांनी व्यक्त केलं.

दरम्यान, तिहेरी तलाक संदर्भातील विधेयक लोकसभेत मंजूर झालं असून, राज्यसभेत मात्र हे विधेयक प्रलंबित आहे. या विधेयकाला एमआयएमने सुरुवातीपासून तीव्र विरोध दर्शवला आहे. तर आता काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी विरोधाची भूमिका घेतली आहे.

नाशिक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Muslim women’s protest against triple talaq in malegaon
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV