नाशिकमध्ये 25 वर्षीय शेतकऱ्याची शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या

नाशिकमध्ये 25 वर्षीय शेतकऱ्याची शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या

मनमाड : नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून 25 वर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील वाके गावात ही घटना घडली.

मनोज शांताराम सावंत असं 25 वर्षीय शेतकऱ्यांचं नाव आहे. शेततळ्याच्या पाण्यात उडी घेऊन मनोज सावंत यांनी आत्महत्या केली.

सततची नापिकी आणि कर्जाचा वाढता डोंगर याला कंटाळून या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. त्यामुळे कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरुच असल्याचं चित्र आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: Debt farmer suicide
First Published:
LiveTV