नाशकात चामर लेणीवर अडकलेल्या 9 विद्यार्थ्यांची सुटका

सिडकोतील हिरे विद्यालयाचे नववीतले पाच विद्यार्थी घरच्यांना न सांगता चामर लेणीवर ट्रेकींगला आले होते.

नाशकात चामर लेणीवर अडकलेल्या 9 विद्यार्थ्यांची सुटका

नाशिक : ट्रेकिंग करण्याचा छंद  केव्हाही चांगला, मात्र ट्रेकिंग करताना ठिकाणाची योग्य ती माहिती न घेता दाखवलेलं धाडसं जीवावर बेतण्याची शक्यताच जास्त असते. नाशिकच्या चामर लेणीवर ट्रेंकिंगसाठी गेलेल्या नऊ विद्यार्थ्यांना याचा अनुभव आला.

सिडकोतील हिरे विद्यालयाचे नववीतले पाच विद्यार्थी घरच्यांना न सांगता चामर लेणीवर ट्रेकींगला आले होते. थ्रील अनुभवण्यासाठी पायवाट सोडून हे विद्यार्थी डोंगराच्या मागील बाजूला उतरले आणि नंतर तिथेच अडकून पडले.

या अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी के. के. वाघ महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांचा ग्रुप पुढे सरसावला. मात्र तेही तिथेच अडकून पडले. यावेळी देवेंद्र जाधव नावाचा विद्यार्थी थेट निसरड्या डोंगरकड्यावरुन खाली कोसळल्यानं जखमी झाला आहे.

डोंगरकड्यावर अडकलेल्या या सर्व विद्यार्थ्यांना पोलिस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षितरित्या बाहेर काढलं.

नाशिक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Nashik : 9 students stuck on Chamar Caves rescued latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV