नाशकात सुकाणू समितीच्या बैठकीत आगंतुक महिलेचा गोंधळ

नाशकात सुकाणू समितीच्या बैठकीत आगंतुक महिलेचा गोंधळ

नाशिक : राज्यभरात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी नाशकात सुकाणू समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत एका आगंतुक महिलेने घोषणाबाजी सुरु केल्याने गोंधळ उडाला.

कल्पना इनामदार असं सुकाणू समितीच्या व्यासपीठावर गोंधळ घालणाऱ्या महिलेचं नाव आहे. इनामदार या मुंबईतल्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. सुकाणू समितीची बैठक सुरु होताच त्यांनी स्टेजवर चढून घोषणाबाजी सुरु केल्याने गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.

सुकाणू समितीतून सर्व राजकीय नेत्यांना काढा आणि सामान्य शेतकऱ्यांना घ्या, किंवा काँग्रेससोबतच राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, मनसे अशा सर्व पक्षांच्या नेत्यांचा समितीत सहभाग घ्या, अशी मागणी त्यांनी केली.

त्याचप्रमाणे, अजित नवले यांनी पुणतांबावासी आणि प्रसारमाध्यमं यांना न सांगता मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याबाबतही इनामदार यांनी आक्षेप नोंदवला.

पाहा व्हिडिओ :


LIVE - सुकाणू समितीची बैठक


सुकाणू समिती बैठकीच्या व्यासपीठावर जाण्यापासुन काँग्रेस नेत्यांना शेतकऱ्यांनी रोखलं. शेतकऱ्यांनी आडकाठी केल्यामुळे काँग्रेस नेते भाई जगताप खाली बसले.

सुकाणू समितीच्या बैठकीला संपकरी शेतकऱ्यांसोबत खासदार राजू शेट्टी, शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील, शेकाप नेते जयंत पाटील, काँग्रेस नेते भाई जगताप उपस्थित होते. राज्यातील शेतकरी आंदोलनाची पुढची दिशा बैठकीनंतर ठरणार आहे. दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास 13 जूनला रेलरोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या


शेतकरी आंदोलनासाठी 21 जणांची नवी सुकाणू समिती


शेतकरी संपावर : किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांची सडेतोड मुलाखत


सुकाणू समितीच्या बैठकीत शेतकरी आंदोलनाची पुढची दिशा ठरणार

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV