व्हीआयपी नंबरच्या बहाण्याने माजी मंत्री घोलपांना लाखोचा गंडा

माजी मंत्री बबनराव घोलप यांना व्हीआयपी मोबाईल नंबर देण्याच्या बहाण्याने एका इसमाने चांगलाच गंडा घातला.

व्हीआयपी नंबरच्या बहाण्याने माजी मंत्री घोलपांना लाखोचा गंडा

नाशिक: फेक कॉल किती महागात पडू शकतात, याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

माजी मंत्री बबनराव घोलप यांना व्हीआयपी मोबाईल नंबर देण्याच्या बहाण्याने एका इसमाने चांगलाच गंडा घातला.

आपण मोबाईल कंपनीमधून बोलत असून व्हीआयपी मोबाईल नंबरसाठी या इसमाने बबनराव घोलप यांच्याकडे 1 लाख 40 लाखांची मागणी केली.

मात्र पैसे देऊनही घोलप यांना नंबर न मिळाल्याने अखेर घोलप यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात त्याबाबत तक्रार केली आहे. त्यामुळे जर तुम्हालाही कोणत्याही अनोळखी नंबरवरून कोणतीही माहिती विचारण्यासाठी फोन आला तर स्वत: बद्दलची कोणतीही माहिती देऊ नका.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Nashik: Babanrao gholap cheated for vip mobile no
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV