पोलिस असल्याचं सांगून नाशकात दागिन्यांसह पर्सचोरी

पोलिस असल्याचं सांगून महिलांना दंग्याची भीती दाखवत अंगावरचे दागिने पर्समध्ये ठेवायला लावायचे. त्यानंतर ही पर्सच हिसकावून पळून जायचं, अशी मोडस ऑपरेंडी असलेली चोरांची टोळी नाशिकमध्ये कार्यरत आहे.

Nashik : Bogus Police looted lady’s ornaments and purse latest update

नाशिक : पोलिस असल्याचं सांगत महिलेचे दागिने लुटल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. पल्सर बाईकवरुन आलेल्या एका भामट्याने ही चोरी केली असून चोरीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

नाशकातील शंकरनगर टाकळी रोडवरुन जाणाऱ्या सकिना जावरवाला यांना एका दुचाकीस्वारानं पोलिस असल्याचं सांगत अडवलं. ‘पुढे तणाव निर्माण झाला असून खूप गर्दी आहे. त्यामुळे आपल्या अंगावरचे दागिने काढून पर्समध्ये ठेवा.’ असं त्या भामट्याने  सकिना यांना सांगितलं.

त्याच्यावर विश्वास ठेवून सकिना यांनी अंगावरचे दागिने काढले आणि पर्समध्ये ठेवले. मात्र काही कळायच्या आतच तो भामटा पर्स घेऊन फरार झाला. सकिना यांनी आरडाओरडा करताच खऱ्या पोलिसांनी धाव घेतली. मात्र तो पर्यंत हा चोरटा फरार झाला होता.

परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात ही घटना कैद झाली आहे. पोलिस असल्याचं सांगून महिलांना दंग्याची भीती दाखवत अंगावरचे दागिने पर्समध्ये ठेवायला लावायचे. त्यानंतर ही पर्सच हिसकावून पळून जायचं, अशी मोडस ऑपरेंडी असलेली चोरांची टोळी नाशिकमध्ये कार्यरत आहे. यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या असून नागरिकांनी अशा भूलथापांना बळी न पडण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

Nasik News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Nashik : Bogus Police looted lady’s ornaments and purse latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

समृद्धी महामार्गाविरोधात नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची काळी दिवाळी
समृद्धी महामार्गाविरोधात नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची काळी...

नाशिक : मुंबई-नागपूर प्रस्तावित समृद्धी महामार्ग प्रकल्पबाधित

सैन्य भरतीच्या अफवेने देवळालीत गर्दी, तरुणांना मनस्ताप!
सैन्य भरतीच्या अफवेने देवळालीत गर्दी, तरुणांना मनस्ताप!

नाशिक : सोशल मीडियावर आलेल्या सैन्य भरतीच्या अफवेवर विश्वास ठेवत

पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाऱ्या इंजिनिअरला अटक
पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाऱ्या इंजिनिअरला अटक

नाशिक : नाशिकमध्ये पेट्रोल पंपवर दरोडा टाकल्याप्रकरणी

नाशकात हॉटेलच्या रुममध्ये घुसून महिलेवर बलात्कार
नाशकात हॉटेलच्या रुममध्ये घुसून महिलेवर बलात्कार

नाशिक : नाशिकमधील संदीप हॉटेलमध्ये उल्हासनगरमधल्या महिलेवर

नाशकात रिसॉर्टवर छापा, बीभत्स नृत्य करणाऱ्या 7 मुलींसह 15 जण अटकेत
नाशकात रिसॉर्टवर छापा, बीभत्स नृत्य करणाऱ्या 7 मुलींसह 15 जण अटकेत

नाशिक : नाशिकमधील टाके घोटी इथल्या रेनफॉरेस्ट रिसॉर्टवर इगतपुरी

साईंच्या पुण्यतिथी उत्सवात भक्तांकडून कोट्यवधींचं दान
साईंच्या पुण्यतिथी उत्सवात भक्तांकडून कोट्यवधींचं दान

शिर्डी : साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवात साईदर्शनासाठी भाविकांनी

गोणीतून 60 जिलेटीनच्या कांड्या, 16 डेटोनेटर जप्त, नाशकात खळबळ
गोणीतून 60 जिलेटीनच्या कांड्या, 16 डेटोनेटर जप्त, नाशकात खळबळ

नाशिक : नाशिकमधील मोंढेवस्ती परिसरात बेवारस स्थितीत स्फोटकं

पुतण्याला प्रेमविवाहात मदत करणं काकाच्या जीवावर बेतलं
पुतण्याला प्रेमविवाहात मदत करणं काकाच्या जीवावर बेतलं

नाशिक : पुतण्याच्या प्रेमविवाहाला मदत केल्यामुळं मुलीच्या

सरकारशी लागेबांधे असणाऱ्यांनी आधीच नोटा बदलल्या : पवार
सरकारशी लागेबांधे असणाऱ्यांनी आधीच नोटा बदलल्या : पवार

नाशिक : ‘नोटाबंदीची गोष्ट म्हणजे मारुतीच्या बेंबीसारखी झाली आहे.

बॉयफ्रेंडला पार्टी देण्यासाठी टू व्हीलर चोरी,  मुलींची आयडिया अंगलट
बॉयफ्रेंडला पार्टी देण्यासाठी टू व्हीलर चोरी, मुलींची आयडिया...

नाशिक: सध्या चोरीच्या घटना वाढताना दिसत आहेत. नाशिकमध्ये तर