खेळताना झोक्याचा फास बसून नाशकात चिमुरडीचा मृत्यू

खेळताना झोक्याचा गळफास बसून नाशिकमध्ये दहा वर्षांच्या बालिकेने प्राण गमावले

खेळताना झोक्याचा फास बसून नाशकात चिमुरडीचा मृत्यू

नाशिक : झोक्याचा गळफास बसून दहा वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नाशकात घडली आहे. गेल्या दोन महिन्यात झोक्याचा फास लागून मृत्यू झाल्याची राज्यातली ही तिसरी घटना आहे.

तितिक्षा राऊळ ही विद्यार्थिनी घरात पलंगावर झोका खेळत होती. त्यावेळी तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. झोक्याचा गळफास बसून तितिक्षाचा श्वास गुदमरला. तितिक्षाच्या वडिलांनी तिला तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार सुरु होण्यापूर्वीच तिला मृत घोषित केलं.

नाशकातील अंबडमधल्या चुंचाले शिवारात रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

आठच दिवसांपूर्वी नाशकातील त्र्यंबक तालुक्यातील हरसुल गावातही असाच प्रकार समोर आला होता, तर औरंगाबाद, मुंबईतही असाच प्रकार घडला होता. चिमुरड्यांवर खेळताना डोळ्यात तेल घालून नजर ठेवायला हवी, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

संबंधित बातम्या :


नायलॉन दोरीचा फास लागून नाशकात 12 वर्षीय मुलाचा मृत्यू


औरंगाबादमध्ये झोक्याचा फास लागून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू


खेळताना गळफास बसून चिमुरड्याचा मृत्यू

नाशिक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Nashik girl died while playing at home latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV