बांगलादेशहून फसवलेल्या तरुणींचा वेश्या व्यवसायासाठी वापर

बांग्लादेशमधील दलाल बेधडक 14-15 वर्षांच्या मुलींना नोकरीच्या बहाण्याने भारतात आणून वेश्या व्यवसायात ढकलत आहेत.

बांगलादेशहून फसवलेल्या तरुणींचा वेश्या व्यवसायासाठी वापर

नाशिक : बांग्लादेश म्हणजे भारताचा अगदी शेजारी देश... सध्या याच बांग्लादेशमधून भारतात वेश्या व्यवसाय करण्यासाठी अल्पवयीन मुलींची सर्रास तस्करी केली जात आहे. सलमा नावाच्या एका तरुणीनं नाशकात आपली कहाणी सांगितली आहे.

बांग्लादेशमधील दलाल बेधडक 14-15 वर्षांच्या मुलींना नोकरीच्या बहाण्याने भारतात आणून वेश्या व्यवसायात ढकलत आहेत.
या बातमीचा 'एबीपी माझा'ने पुराव्यासकट पर्दाफाश केला आहे. सलमाने तिचा नाशिकच्या सिन्नरच्या वेश्यावस्तीपर्यंतचा भीषण प्रवास सांगितला.

अल्पवयीन मुलींना हेरुन त्यांना बेकायदेशीररित्या सीमेवरुन भारतात कसं आणलं जातं.  रेड लाईट परिसरात त्यांची ने-आण कशी केली जाते...? वेश्या व्यवसाय करण्यास नकार दिला, तर बांग्लादेशातले दलाल कसे या मुलींच्या कुटुंबीयांना  मारहाण करतात..? याची माहिती स्वतः बांग्लादेशहून वेश्या व्यवसायासाठी भारतात पाठवलेल्या सलमाने दिली आहे.

पाहा व्हिडिओ :

नाशिक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Nashik : Human trafficking from Bangladesh, sold for sex racket latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV