पितृपक्षात पितरांच्या मोक्षासाठी जखमी कावळ्याचा 'बाजार'

नाशिककरांच्या पितरांना मोक्ष देण्याचं पुण्य कमवताना, मांज्यानं जखमी झालेला कावळ्याच्या मालकानं खिसा देखील भरल्याची चर्चा आहे.

Nashik : Injured Crow used for Pitrupaksha rituals latest update

नाशिक : सध्या पितृपक्ष सुरु असल्यामुळे सगळ्यांनाच पितरांची आठवण झाली आहे. या जगाचा निरोप घेतलेल्या पितरांना मोक्ष मिळावा म्हणून सगळेच कावळ्यांचा धावा करत आहेत. कारण कावळा शिवल्याशिवाय पितरांना मोक्ष मिळत नाही, अशी लोकांची भावना आहे. मात्र लोकांच्या याच भावनेचं भांडवल करत नाशिकमध्ये एका अवलियानं जखमी कावळ्याचा बाजार मांडला आहे.

पितरांच्या नैवेद्याला काकस्पर्श व्हावा, म्हणून नाशिककरांची सुरु असलेली धडपड पाहून कुणालाही हसू येईल. रेशन दुकानावर रॉकेल आल्यानंतरही झुंबड उडत नसेल, तशी गर्दी या कावळ्यासाठी होते.

कावळ्यानं चोच मारल्याशिवाय पितरांना मोक्ष मिळत नाही, असं म्हणतात. नाशिककरांच्या पितरांना मोक्ष देण्याचं पुण्य कमवताना, मांज्यानं जखमी झालेला कावळ्याच्या मालकानं खिसा देखील भरल्याची चर्चा आहे.

पितृपक्ष सुरु असल्यामुळे कावळ्याला किती डिमांड आहे, हे रामकुंडावर फेरफटका मारल्यावर पाहायला मिळतं. लोक अक्षरशः ताटकळत उभे राहिलेले दिसतात. एखाद्या समारंभाची पंगत जेवू शकेल एवढा नैवेद्य काकस्पर्शाच्या प्रतीक्षेत आहे.

फक्त पितृपक्षालाच कावळ्याची आठवण काढणारे आपण, त्यांच्या घटत्या संख्येबद्दल अजिबात विचार करायला तयार नाही. पिंडाला कावळा शिवल्यानं दिवंगत पूर्वजांना मोक्ष मिळतो हा श्रद्धेचा भाग झाला. मात्र कावळ्यांप्रमाणे इतर पक्ष्यांच्या मुळावर घाला घालणारे आपणच आहोत हे विसरुन चालणार नाही.

जर पक्ष्यांच्या संवर्धनासाठी वेळीच पाऊल उचललं नाही, तर पितरांच्या पिंडाला शिवणारा कावळा फक्त अंकलिपीच्या चित्रातच बघायला मिळेल.

Nasik News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Nashik : Injured Crow used for Pitrupaksha rituals latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

नाशिकमधील 10 किलो सोनं चोरीचा उलगडा, विहिरीत लपवलेले दागिने जप्त
नाशिकमधील 10 किलो सोनं चोरीचा उलगडा, विहिरीत लपवलेले दागिने जप्त

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पिंपळगावातल्या सराफाच्या दुकानात

ना शटर उचकटलं, ना तिजोरी फोडली, तरीही 10 किलो सोनं पळवलं!
ना शटर उचकटलं, ना तिजोरी फोडली, तरीही 10 किलो सोनं पळवलं!

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील पिंपळगावातल्या सराफाच्या दुकानातून

खडसेंची नाशिकमधील एसीबीच्या कार्यालयात हजेरी
खडसेंची नाशिकमधील एसीबीच्या कार्यालयात हजेरी

नाशिक : भ्रष्टाचाराचे एका मागोमाग एक आरोप आणि चौकशांमुळे बेजार

नाशकातील गोदाकाठ पाण्याखाली; केशार्पण, पिंडदान रस्त्यावर
नाशकातील गोदाकाठ पाण्याखाली; केशार्पण, पिंडदान रस्त्यावर

नाशिक : नाशिकमधील मुसळधार पाऊस आणि धरणांमधून केलेल्या पाण्याचा

'यावेळी पाणी फेकलंय, होकार दिला नाहीस तर अॅसिड फेकेन'
'यावेळी पाणी फेकलंय, होकार दिला नाहीस तर अॅसिड फेकेन'

नाशिक : ‘यावेळी पाणी फेकलं आहे, मात्र तू होकार दिला नाहीस तर

छापेमारीनंतर रखडलेला कांदे लिलाव आज सुरु होण्याची चिन्हं
छापेमारीनंतर रखडलेला कांदे लिलाव आज सुरु होण्याची चिन्हं

नाशिक: नाशिकमध्ये गेल्या 4 दिवसांपासून रखडलेले कांद्याचे लिलाव आज

साठेबाज कांदा व्यापाऱ्यांचं दुबई हवाला कनेक्शन, ईडीला संशय
साठेबाज कांदा व्यापाऱ्यांचं दुबई हवाला कनेक्शन, ईडीला संशय

मुंबई/नाशिक : नाशकातील साठेबाज कांदा व्यापाऱ्यांनी दुबई

बोबडं बोलल्याने चिमुकल्याला सावत्र पित्याकडून 40 चटके
बोबडं बोलल्याने चिमुकल्याला सावत्र पित्याकडून 40 चटके

नाशिक : साडे तीन वर्षांच्या चिमुकल्याला सावत्र पित्यानं

सप्तश्रृंगी गडावर यंदापासून बोकडबळी प्रथेला बंदी
सप्तश्रृंगी गडावर यंदापासून बोकडबळी प्रथेला बंदी

नाशिक : सप्तश्रृंगी गडावर तुम्हाला बोकडाचा बळी द्यायचा असेल, तर

7 कांदे व्यापाऱ्यांवर 120 आयकर अधिकाऱ्यांची धाड, दर घसरले
7 कांदे व्यापाऱ्यांवर 120 आयकर अधिकाऱ्यांची धाड, दर घसरले

नाशिक : नाशिक शहर आणि जिल्ह्यात कांद्याच्या व्यापाऱ्यांवर