सव्वा दोन तासांच्या खोळंब्यानंतर नाशिक-मुंबई रेल्वे वाहतूक सुरु

सव्वा दोन तासांच्या खोळंब्यानंतर नाशिक-मुंबई रेल्वे वाहतूक सुरु

नाशिक : सव्वा दोन तासांच्या खोळंब्यानंतर नाशिक-मुंबई रेल्वे वाहतूक अखेर सुरु झाली आहे. खोळंबलेल्या गाड्या मार्गस्थ झाल्या आहेत.

ओढा-नाशिक स्टेशनदरम्यान वाराणसी-एलटीटी एक्स्प्रेसचं इंजिन बंद पडल्याने नाशिक-मुंबई रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती.  या खोळंब्याचा मोठा परिणाम नाशिक-मुंबई मार्गावरील एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावरही झाला होता.

दोन तासांपासून नाशिक-मुंबई मार्गावरील मंगला एक्स्प्रेस, महानगरी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, पटना एक्स्प्रेस, गोदावरी एक्स्प्रेस या गाड्या खोळंबल्या आहेत. अखेर बिघाड दुरुस्त झाल्याने वाहतूक पूर्ववत झाली आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV