मुंढे नाशिक पालिका आयुक्तपदी, अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले

प्रवीण गेडाम यांच्यासारख्या कार्यक्षम अधिकाऱ्यानंतर मुंढेंसारखा कर्तबगार अधिकारी शहराला मिळावा अशी नाशिककरांची इच्छा होती.

मुंढे नाशिक पालिका आयुक्तपदी, अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले

नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे अधिकारी पदाधिकाऱ्यांचे धाबे दणादणले आहेत. काही करुन मुंढेंची बदली लांबणीवर पडावी, यासाठी त्यांनी देव पाण्यात ठेवल्याचं म्हटलं जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या कारभारात सुसूत्रता यावी, रखडलेली कामं मार्गी लागावीत, यासाठी डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंढेना जाणीवपूर्वक नाशिकला पाठवण्यात आल्याचं बोललं जातं. प्रवीण गेडाम यांच्यासारख्या कार्यक्षम अधिकाऱ्यानंतर मुंढेंसारखा कर्तबगार अधिकारी शहराला मिळावा अशी नाशिककरांची इच्छा होती.

शहरातील इमारतीच्या कपाटाचा प्रश्न, शेकडो कोटींच्या रस्ते डांबरीकरणाचा विषय, एलईडी बसवण्याचा वादग्रस्त प्रस्ताव, स्मार्ट सिटी स्पर्धेत टिकून राहण्याचे आव्हान, गोदावरी प्रदूषण यासारखे रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचं आव्हान मुंढेंसमोर आहे. त्यामुळे ते कुठल्या विषयाला हात घालतात याकडे नाशिककरांचे लक्ष लागलं आहे.

तुकाराम मुंढे यांच्यासह राज्यातील सहा सनदी अधिकाऱ्यांची बदली


नाशिक महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांची बदली झाली आहे. पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदी असलेल्या तुकाराम मुंढे यांची त्यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंढे यांची नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरुन पुण्यात पीएमपीएमएलच्या अध्यक्ष आणि संचालकीय व्यवस्थापकपदी बदली करण्यात आली होती. नवी मुंबईप्रमाणेच पुण्यातही राजकारण्यांशी त्यांचे खटके उडाले.

नवी मुंबईत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने तुकाराम मुंढे यांच्यावर अविश्वास ठराव आणला होता. राजकीय वातावरण तापल्यानंतर तुकाराम मुंढे यांची बदली पुण्यात करण्यात आली. तुकाराम मुंढे यांच्या शिस्तीचा फटका पुण्यातील राजकारण्यांनाही बसला. शिवाय कर्मचाऱ्यांनीही तुकाराम मुंढेंच्या कारभाराची धास्ती घेतली होती.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Nashik Municipal Corporation Officers tensed after Tukaram Mundhe’s transfer latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV