नाशकात ऑन ड्युटी डॉक्टर गायब, महिलेची रिक्षातच प्रसुती

अर्धा तास वाट पाहिल्यानंतरही मोनिकासाठी रुग्णालयाकडून कोणीही आलं नाही. अखेर आजूबाजूच्या महिला तिच्या मदतीसाठी धावून आल्या.

नाशकात ऑन ड्युटी डॉक्टर गायब, महिलेची रिक्षातच प्रसुती

नाशिक : नाशिकमधील आरोग्य व्यवस्था किती निर्ढावलेली आहे, याचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. पंचवटीतील महापालिकेच्या मायको रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी कामावर हजर नसल्यानं गर्भवतीची रिक्षातच प्रसुती करावी लागली.

मोनिका साकेत या 22 वर्षीय महिलेनं पंचवटीतील महापालिकेच्या मायको रुग्णालयात प्रसुतीसाठी नाव नोंदवलं होतं. सोमवारी दुपारी मोनिका रिक्षाने प्रसुतिगृहापर्यंत आली. परंतु निरोप पाठवूनही कोणीही तिला नेण्यासाठी स्ट्रेचर घेऊन आलं नाही.

नाशिक जिल्हा रुग्णालयात पाच महिन्यात 187 अर्भकांचा मृत्यू


साधारण अर्धा तास वाट पाहिल्यानंतरही मोनिकासाठी रुग्णालयाकडून कोणीही आलं नाही. अखेर आजूबाजूच्या महिला तिच्या मदतीसाठी धावून आल्या. रुग्णालयाऐवजी आवारातील रिक्षातच तिची प्रसुती करावी लागली.

नाशकातील पालिका रुग्णालयांमध्ये नवजात अर्भकांचे मृत्यू झाल्याचं प्रकरण ताजं असतानाही आरोग्य व्यवस्था निर्ढावलेलीच असल्याचं पाहायला मिळत आहे.

नाशिक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV