'यावेळी पाणी फेकलंय, होकार दिला नाहीस तर अॅसिड फेकेन'

सोळा वर्षीय शाळकरी विद्यार्थिनी गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास स्कूल बसने शाळेत चालली होती. यावेळी तिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या विकृताने तिची शाळेची बस अडवली. बसमध्ये शिरुन तरुणाने तिच्या तोंडावर बाटलीतलं पाणी फेकलं

'यावेळी पाणी फेकलंय, होकार दिला नाहीस तर अॅसिड फेकेन'

नाशिक : 'यावेळी पाणी फेकलं आहे, मात्र तू होकार दिला नाहीस तर पुढच्या वेळी अॅसिड फेकेन' अशी धमकी शाळकरी विद्यार्थिनीला देणाऱ्या विकृताला पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणाने थेट स्कूल बस अडवून तक्रारदार तरुणीला धमकी दिल्याचा आरोप आहे.

सोळा वर्षीय शाळकरी विद्यार्थिनी गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास स्कूल बसने शाळेत चालली होती. यावेळी तिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या विकृताने तिची शाळेची बस अडवली. बसमध्ये शिरुन तरुणाने तिच्या तोंडावर बाटलीतलं पाणी फेकलं. 'तू हो म्हण. नाहीतर, यावेळी पाणी फेकलं आहे, पुढच्या वेळी अॅसिड फेकेन' अशी धमकी तिला दिली.

नाशकातील म्हसरुळ परिसरातील वडनगरमध्ये हा प्रकार घडला. या प्रकारामुळे शालेय विद्यार्थिनींच्या पालकांमध्ये मुलींच्या सुरक्षेबाबत चिंतेचं वातावरण आहे. म्हसरुळ पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक झाली आहे.

तक्रारदार विद्यार्थिनी दहावीत शिकते. आरोपी संजय शेरसिंग करणसिंग तीन महिन्यांपासून वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरुन फोन करुन तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. विद्यार्थिनीच्या घरच्यांनी समज देऊनही त्याने ही हिंमत केल्याने पालकांमध्ये भीती आणि संताप आहे.

हा प्रकार घडला तेव्हा बसचालकही शांत राहिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. बसमध्ये कोणीही अटेंडंट नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. घडलेल्या प्रकारामुळे इतर मुलांच्या मनावरही परिणाम झाला आहे.

नाशिक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV