बटाटे शिजवताना कुकरचा स्फोट, वडापाव विक्रेत्याचा मृत्यू

घरी कुकरमध्ये बटाटे शिजवायला ठेवले असताना कुकरचं झाकण अचानक उघडून अंगावर आल्यामुळे वडापाव विक्रेता जखमी झाला होता

बटाटे शिजवताना कुकरचा स्फोट, वडापाव विक्रेत्याचा मृत्यू

नाशिक : बटाटे शिजवताना कुकरचा स्फोट होऊन वडापाव विक्रेत्याचा मृत्यू झाला आहे. नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

45 वर्षीय अशोक पाटील हे वडापाव विक्रेते होते. रविवारी दुपारी त्यांनी घरी कुकरमध्ये बटाटे शिजवायला ठेवले होते. त्यावेळी शिटी होत नसल्यामुळे पाटील कुकरजवळ गेले.

अचानक कुकरचं झाकण अचानक उघडून अंगावर आल्यामुळे पाटील यांचं पोट, छाती आणि चेहऱ्यावर गंभीर जखम झाली होती. त्याचप्रमाणे किचनमधील सामानही अस्ताव्यस्त पडलं.

अशोक यांना परिसरातील नागरिकांनी तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नाशिकमधील जेलरोड परिसरातील अयोध्यानगर मध्ये ही दुर्दैवी घटना घडली.

नाशिक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV