जिम करताना कोसळलेल्या अजिंक्यचा मृत्यू कशामुळे?

जिम करताना कोसळलेल्या अजिंक्यचा मृत्यू कशामुळे?

नाशिक : उत्तम शरीरयष्टी मिळवण्यासाठी हल्ली प्रत्येकाचा जिमकडे ओढा वाढला आहे. मात्र झटपटरित्या फिटनेस मिळवण्याचा प्रयत्न जीवावरही बेतू शकतो. नाशिकमध्ये घडलेली घटना याबाबत सगळ्यांनाच सावध करणारी आहे.

नाशिकच्या बॉडी झोन जिममधील दृश्यं बघून अख्खा महाराष्ट्र शॉकमध्ये आहे. 19 वर्षाचा अजिंक्य लोळगे हा इंजिनिअरींगचा विद्यार्थी. शुक्रवारी सहा वाजता तो जिममध्ये गेला आणि भोवळ आल्याने तिथेच गतप्राण झाला.

अजिंक्यचं कुटुंब सिडकोच्या उपेंद्रनगर भागात राहतं. वडील सरकारी नोकरीत, तर आई अंगणवाडी शिक्षिका. अजिंक्यला दोन बहिणी आहेत. वर्गात कायम पहिल्या तीनमध्ये असलेल्या अजिंक्यला खूप शिकायचं होतं, पण त्यासाठी त्याला फिटसुद्धा राहायची इच्छा होती. त्यामुळे तीनच दिवसांपूर्वी त्यानं जिम लावली होती.

एकुलता एक मुलगा गेल्यानं आई-वडीलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बहिणींच्या डोळ्याचं पाणी ठरत नाही.

अजिंक्यचा मृत्यू कशामुळे झाला, हे वैद्यकीय तपासणीतून पुढे येईल. मात्र केवळ सिक्स पॅक अॅब्ज आणि फिटनेसच्या मागे लागून शरीर आणि मनाला ताण देणं कितपत योग्य आहे ? याचा विचार करायला हवा

अवघ्या विशी-पंचविशीत ह्रदयविकारानं तरुणांचा मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शारीरिक फिटनेससोबतच मानसिक फिटनेस कायम राहील, डाएट उत्तम राहील याचीही काळजी घ्या.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV