उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर नाशिक झेडपीत शिवसेना-राष्ट्रवादी युती?

By: | Last Updated: > Monday, 13 March 2017 3:50 PM
Nashik ZP : Shivsena and NCP likely to form alliance

नाशिक : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पवित्र्यामुळे जिल्हा परिषदेतलं राजकारण चर्चेत आलं आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडीसाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपला दूर ठेवून नाशकात शिवसेना राष्ट्रवादीच्या मदतीने जिल्हा परिषद अध्यक्ष बसवण्याची चिन्हं आहेत.

जिल्हा पातळीवर भाजप वगळता शक्य त्या पक्षाचा झेडपी अध्यक्ष बसवण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. संख्याबळाचा विचार केला तर नाशिक जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना 25 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष आहे. मात्र राष्ट्रवादी किंवा भाजपशी युती केल्याशिवाय त्यांना सत्ता स्थापन करता येणार नाही.

झेडपीत भाजपला रोखणार, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र!

शिवसेना नेते आणि संपर्कप्रमुखांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत. त्यामुळे सेना-राष्ट्रवादी एकत्र येऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची चिन्हं आहेत.

दुसरीकडे, राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येऊन शिवसेनेला बाजूला ठेवण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा परिषदेत कोणत्या पक्षाचा अध्यक्ष बसतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

नाशिक जिल्हा परिषद संख्याबळ –   

एकूण जागा 73

मॅजिक फिगर 37

पक्षीय बलाबल

शिवसेना – 25,
राष्ट्रवादी – 18,
भाजप -15,
काँग्रेस – 8,
माकप – 3,
अपक्ष आणि इतर 4

महत्त्वाचं म्हणजे मुंबई महापालिकेत भाजपने शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्याची परतफेड म्हणून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत शिवसेना भाजपला पाठिंबा देणार असल्याची माहिती आहे.

First Published:

Related Stories

10 दिवसांपासून पाऊस नाही, नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत
10 दिवसांपासून पाऊस नाही, नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत

नंदुरबार : पावसाने पाठ फिरवल्याने नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी

सदाभाऊ खोत यांची ‘स्वाभिमानी’तून हकालपट्टी?
सदाभाऊ खोत यांची ‘स्वाभिमानी’तून हकालपट्टी?

मुंबई : खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या

संत निळोबारायांच्या पालखीत अण्णा हजारेही सहभागी
संत निळोबारायांच्या पालखीत अण्णा हजारेही सहभागी

इंदापूर : संत निळोबाराय यांच्या पालखी सोहळ्यात जेष्ठ समाजसेवक

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/06/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/06/2017

मराठवाडा वगळता राज्यभरात पावसाची दमदार बॅटिंग, नागपूरमध्ये

धनदांडग्यांच्या कर्जमाफीसाठी सुकाणू समितीचा लढा : पांडुरंग फुंडकर
धनदांडग्यांच्या कर्जमाफीसाठी सुकाणू समितीचा लढा : पांडुरंग फुंडकर

बुलडाणा : गरीब शेतकऱ्यांसाठी लढणारी सुकाणू समिती आता धनदांडग्या

365 दिवस चालणारी वाशिममधील जिल्हा परिषदेची शाळा 'हाऊसफुल्ल'
365 दिवस चालणारी वाशिममधील जिल्हा परिषदेची शाळा 'हाऊसफुल्ल'

वाशिम : राज्यात अनेक जिल्हा परिषद शाळांना पटसंख्याअभावी उतरती कळा

मराठवाडा वगळता राज्यभरात पावसाची हजेरी, नागपुरात मुसळधार
मराठवाडा वगळता राज्यभरात पावसाची हजेरी, नागपुरात मुसळधार

नागपूर/मुंबई : नागपुरात झालेल्या तुफान पावसाने रस्ते जलमय झालेले

मुंबईत अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी मुदत वाढवली!
मुंबईत अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी मुदत वाढवली!

मुंबई : मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाची

नियमित कर्ज भरणाऱ्यांचा कर्ज न भरण्याचा इशारा
नियमित कर्ज भरणाऱ्यांचा कर्ज न भरण्याचा इशारा

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक

वायफाय यंत्रणेवर पावसाचं पाणी, ठाणे स्टेशनवरील इंटरनेट बंद
वायफाय यंत्रणेवर पावसाचं पाणी, ठाणे स्टेशनवरील इंटरनेट बंद

ठाणे : मुंबई आणि उपनगरात सुरु असलेल्या जोरदार पावसाचा फटका, लोकल