नाशिकमधील जवान आणि त्यांच्या पत्नीची गोळ्या झाडून हत्या

नाशिकच्या सिन्नरमधील जवान राजेश केकाण आणि पत्नी शोभा केकाण यांची त्यांच्याच सहकाऱ्यानं गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

नाशिकमधील जवान आणि त्यांच्या पत्नीची गोळ्या झाडून हत्या

जम्मू-काश्मीर : नाशिकच्या सिन्नरमधील जवान राजेश केकाण आणि पत्नी शोभा केकाण यांची त्यांच्याच सहकाऱ्यानं गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडजवळील औद्योगिक सुरक्षा दलातील जवानांच्या निवासी वसाहतीत ही घटना घडली आहे.

ईगलप्पा असं सहकारी जवानाचं नाव असून त्यानं आधी स्वतःच्या पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली आणि त्यानंतर जवान राजेश केकाण आणि त्यांच्या पत्नीवरही गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला. राजेश केकाण हे मूळचे सिन्नरच्या टेंभूरवाडी गावातले आहेत.

हत्येच्या बातमीनं संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मृत राजेश केकाणच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, वडिल असा परिवार आहे. दरम्यान, या हत्येचं मूळ कारण अद्याप समजू शकलेले नाही.

नाशिक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Nasik jawans and their wife were shot and killed latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV