कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक, पण समाधानकारक नाही : उद्धव ठाकरे

no advantage of loan waiver to farmers says uddhav thackerey latest updates

नाशिक :  शेतकरी कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक आहे. मात्र समाधानकारक नाही, शेतकऱ्यांच्या मनात अजूनही असंतोष आहे, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगावात उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

शेतकरी लढ्याचा इतिहास घडवणाऱ्या नाशिकच्या शेतकऱ्यांचं दर्शन घेण्यासाठी आज मी इथं आलोय. मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांवरील कर्ज या निर्णयाने बऱ्यापैकी कमी होईल. पण ज्या शेतकऱ्यांनी संपाची ठिणगी टाकली त्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, अशी अपेक्षाही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.

1 एप्रिल 2012  ते 30 जून 2016 या कालावधीत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंतचं कर्ज सरसकट माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. सरकारने 2016 ऐवजी 2017 पर्यंतच्या थकबाकीदारांना दिलासा द्यावा, कांद्याला हमीभाव द्यावा, यासाठी शिवसेना पाठपुरावा करेल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर सरकारला स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावीच लागेल, असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील राहिल, असं आश्वासनही त्यांनी दिलं.

दरम्यान शेतकऱ्यांवरचे गुन्हे दिसले, तर सरकारचं काय करायचं ते मी बघतो, असा सज्जड दमही उद्धव ठाकरेंनी दिला.

कर्जमाफी ही शेतकऱ्यांच्या शौर्याचं यश असल्याचंही उद्धव ठाकरे सांगायला विसरले नाहीत. रविवारी पिंपळगावातील शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरेंनी संवाद साधला. शेतकरी संवाद यात्रा पिंपळगाव ते पुणतांबा दरम्यान होणार आहे. रविवारी दिवसभर उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत.

Nasik News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:no advantage of loan waiver to farmers says uddhav thackerey latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

महिलांचा गाऊन घालून अश्लिल चाळे करणाऱ्या विकृताची नाशकात दहशत
महिलांचा गाऊन घालून अश्लिल चाळे करणाऱ्या विकृताची नाशकात दहशत

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या सिडको परिसरात एका

मॅट्रिमोनिअल वेबसाईटवरुन तरुणीला लाखोंचा गंडा, नायजेरियन तरुण अटकेत
मॅट्रिमोनिअल वेबसाईटवरुन तरुणीला लाखोंचा गंडा, नायजेरियन तरुण...

नाशिक : मॅट्रिमोनिअल वेबसाईट्सवरुन लग्नाचं आमिष दाखवत एका तरुणीला 1

नाशिकमध्ये पत्नी, सासूच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या
नाशिकमध्ये पत्नी, सासूच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

नाशिक : पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या

नाशिकमधील उंटदरी घाटात 600 मीटर खोल दरीत कार कोसळली!
नाशिकमधील उंटदरी घाटात 600 मीटर खोल दरीत कार कोसळली!

नाशिक : नाशिकमधील कसाऱ्याजवळ उंटदरी घाटातील दरीत कार कोसळल्याची

आमदार बच्चू कडू यांना नाशिकमध्ये अटक!
आमदार बच्चू कडू यांना नाशिकमध्ये अटक!

नाशिक : आमदार बच्चू कडू यांना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक

आ. बच्चू कडूंनी नाशिक महापालिकेच्या आयुक्तांवरच हात उगारला!
आ. बच्चू कडूंनी नाशिक महापालिकेच्या आयुक्तांवरच हात उगारला!

नाशिक: आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या समर्थकांनी नाशिक महापालिकेत

नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या पाण्यात सेल्फीसाठी तरुणाची स्टंटबाजी
नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या पाण्यात सेल्फीसाठी तरुणाची स्टंटबाजी

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील नांदूरमध्यमेश्वर धरणाची पातळी मुसळधार

नाशिकमध्ये सरकारी कार्यालयांमध्येच डेंग्यूच्या अळ्या सापडल्या
नाशिकमध्ये सरकारी कार्यालयांमध्येच डेंग्यूच्या अळ्या सापडल्या

नाशिक : नाशिकमध्ये सरकारी कार्यालयांमध्येच डेंग्यूच्या अळ्या

नाशिक महापालिकेत चक्क गायीला श्रद्धांजली
नाशिक महापालिकेत चक्क गायीला श्रद्धांजली

नाशिक : कथित गोरक्षकांचा राज्यासह देशभरात धुमाकूळ सुरु असतानाच

मुसळधार पावसानंतरही नाशिकच्या 15 पैकी 6 तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा
मुसळधार पावसानंतरही नाशिकच्या 15 पैकी 6 तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा

नाशिक : गेल्या काही दिवसांत झालेल्या धुवांधार पावसानं नाशिकला