दिल्ली हादरली पाहिजे असं आंदोलन करा: राजू शेट्टी

Raju Shetty attack on bjp govt in sukanu committee latest update

नाशिक: ‘दिल्ली हादरली पाहिजे असं आंदोलन करा’, असं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी केलं आहे. नाशिकमधील सुकाणू समितीच्या बैठकीत बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

 

‘आता भाजपमध्ये इन कमिंग नाही, तर आऊट गोईंग होईल.’ अशी टीकाही यावेळी राजू शेट्टी यांनी भाजपवर केली. तसंच आपण सत्तेतूनही लवकरच बाहेर पडू असंही यावेळी राजू शेट्टी म्हणाले. दरम्यान, कर्जमाफीबाबत आपण चर्चेची दारं अजूनही बंद केली नसल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं.

 

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नाशिकमध्ये आज सुकाणू समितीची बैठक झाली. या बैठकीदरम्यान सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. मागण्या मान्य न झाल्यास 12 जून रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढू. तसंच 13 जूनला राज्यभरात रेलरोको करु असा इशारा सुकाणू समितीच्या बैठकीत करण्यात आला आहे.

 

कर्जमाफी आणि शेतमालाच्या हमी भावासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेलं आंदोलन यापुढे कसं असणार आहे, यासाठी नव्याने स्थापन झालेल्या सुकाणू समितीची नाशिकमध्ये बैठक सुरु आहे. या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, शेकाप नेते जयंत पाटील, आमदार बच्चू कडू आणि शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील हे हजर आहेत.

 

संबंधित बातम्या:

 

सुकाणू समितीच्या बैठकीत सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

नाशकात सुकाणू समितीच्या बैठकीत आगंतुक महिलेचा गोंधळ

शेतकरी संप देशस्तरावर नेणार: खा. राजू शेट्टी

सुकाणू समितीच्या बैठकीत शेतकरी आंदोलनाची पुढची दिशा ठरणार

Maharashtra News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Raju Shetty attack on bjp govt in sukanu committee latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

मालेगाव स्फोटाचा चेहरा बनलेले प्रसाद पुरोहित यांची कहाणी आहे तरी काय?
मालेगाव स्फोटाचा चेहरा बनलेले प्रसाद पुरोहित यांची कहाणी आहे तरी...

नवी दिल्ली : लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित… 2008 च्या मालेगाव

चालकाला चक्कर आल्याने एसटी शेतात घुसली, 43 प्रवासी जखमी
चालकाला चक्कर आल्याने एसटी शेतात घुसली, 43 प्रवासी जखमी

सातारा : एसटी चालकाला चक्कर आल्यामुळे बस शेतात घुसल्याची घटना

राणेंसाठी सार्वजनिक बांधकाम खातं सोडण्याची चंद्रकांतदादांची तयारी
राणेंसाठी सार्वजनिक बांधकाम खातं सोडण्याची चंद्रकांतदादांची...

सिंधुदुर्ग : एकीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी

VIDEO : औरंगाबादमध्ये एसटी बस नाल्यात अडकली!
VIDEO : औरंगाबादमध्ये एसटी बस नाल्यात अडकली!

औरंगाबाद : मराठवाड्यात काल रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार

राम सत्यवचनी, मग भक्त नरेंद्र मोदी असत्यवचनी कसे? : राजू शेट्टी
राम सत्यवचनी, मग भक्त नरेंद्र मोदी असत्यवचनी कसे? : राजू शेट्टी

नागपूर : राम सत्यवचनी होता, मग भक्त नरेंद्र मोदी असत्यवचनी कसे, याचे

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 20/08/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 20/08/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 20/08/2017   राज्यभरात पावसाचं दमदार

भाजपमध्ये कोणाला घ्यायचं, याचे निर्णय कोल्हापुरातून : पवार
भाजपमध्ये कोणाला घ्यायचं, याचे निर्णय कोल्हापुरातून : पवार

कोल्हापूर :  सरकारमध्ये मंत्री कोण असावं, कोण नसावं, याचा निर्णय

जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाविरोधात स्थानिकांचा पुन्हा एल्गार
जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाविरोधात स्थानिकांचा पुन्हा एल्गार

रत्नागिरी : रत्नागिरीतील जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात

रायगडमध्ये तीन वाहनांतून 4 हजार किलो गोवंश सदृश्य मांस जप्त
रायगडमध्ये तीन वाहनांतून 4 हजार किलो गोवंश सदृश्य मांस जप्त

रायगड : माणगावमध्ये 3 वाहनांतून गोमांस सदृश्य मांस जप्त  करण्यात आलं

नांदेड शहर जलमय, महापालिका आयुक्तांच्या घरातही पाणी
नांदेड शहर जलमय, महापालिका आयुक्तांच्या घरातही पाणी

नांदेड : नांदेड जिल्ह्यातल्या 16 पैकी 13 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे.