नाशिकच्या महापौरपदी भाजपच्या रंजना भानसी बिनविरोध

नाशिकच्या महापौरपदी भाजपच्या रंजना भानसी बिनविरोध

नाशिक : नाशिकच्या महापौरपदी भाजपच्या रंजना भानसी आणि उपमहापौरपदी प्रथमेश गीते यांची बिनविरोध निवड झाली. नाशिकच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौरपदाची निवडणूक बिनविरोध झाली.

काँग्रेसच्या महापौरपदाच्या उमेदवार आशा तडवी यांना अर्ज मागे घेण्यासाठी रंजना भानसी यांनी विनंती केली. त्यानंतर आशा तडवींनी आर्ज मागे घेतला. त्यामुळे नाशिक महापौरपदाची निवडणूक बिनविरोध झाली. त्याचप्रकारे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपमहपौरपदाच्या उमेदवार सुषमा पगार यांनीही निवडणुकीतून माघार घेतल्याने भाजपच्या प्रथमेश गीते यांची उपमहौरपदी बिनविरोध निवड झाली.

महापौरपदी रंजना भानसी बिनविरोध विराजमान झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ‘रामायण’ या महापौर बंगल्याबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली आणि ढोलताशे वाजवत गुलालाची उधळण सुरु केली. कार्यकर्त्यांनी ‘रामायण’ बंगल्यावर भाजपचा झेंडा फडकवला.

Ramayan Bunglow

जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक महापालिकेच्या सभागृहात पार पडली. निवडणूक शांततेत पार पाडावी यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शरणपूर रोड, टिळकवाडी सिग्नल ते तरणतलाव रस्ता निवडणुकीच्या काळात वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.

नाशिकमध्ये पहिल्यांदाच कोणत्याही फोडाफोडी, सहली, राजकीय खलबतं, गुप्त बैठका यांशिवाय महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक पार पडली. अर्थात याला कारण सत्ताधारी भाजपकडे संपूर्ण बहुमत होतं. भाजपला नाशिक महापालिकेत 122 पैकी 66 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे नाशिक महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौरपदाची निवडणूक बिनविरोध आणि शांततेत पार पडली.

नाशिक महापालिकेतील बलाबल :

  • भाजप – 66

  • शिवसेना – 35

  • काँग्रेस – 6

  • राष्ट्रवादी – 6

  • मनसे – 5

  • इतर – 4

नाशिक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV