जुलै महिन्यात राज्यात राजकीय भूकंप : संजय राऊत

sanjay raut attacks devendra fadnavis government over farmer strike issue

नाशिक : शेतकरी आंदोलनावरुन राज्य सरकारवर सातत्यानं सरकारला गोत्यात आणणाऱ्या शिवसेनेनं आता नवी भूमिका जाहीर केली आहे. शिवसेनेच्या संपर्क अभियानात बोलताना खासदार संजय राऊत यांनी जुलै महिन्यात राज्यात भूकंप होईल, असं भाकित वर्तवलं आहे.

”आपला मित्रपक्षच आपल्याला संपवण्यासाठी वेगवेगळ्या खेळी करत आहे. त्यामुळे आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. जुलै महिन्यात यासाठी शिवसेना आपली राजकीय लढाई सुरु करेल. ही लढाई लढण्यासाठी तयार राहा,” असं आवाहन ही त्यांनी यावेळी शिवसैनिकांना केलं.

शिवाय, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती नको, तर सरसकट कर्जमाफी हवी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

दुसरीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीत दिवाकर रावते यांच्या सहभागावरही त्यांनी यावेळी भूमिका स्पष्ट केली. या समितीत दिवाकर रावते शिवसेनेची ठाम भूमिका मांडतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेल्या मंत्रिगटाची आज दुपारी बैठक होती. पण या बैठकीला दिवाकर रावते उपस्थीत नव्हते. यावर दिवाकर रावते यांना विचारले असता, मुख्यमंत्र्यांनी आपल्याला अंधारात ठेवल्याचं सांगून, याबाबतची कोणतीही कल्पना दिली नसल्याची प्रतिक्रिया दिली.

तर या बैठकीसाठी आपण स्वत: परिवहन मंत्री दिवाकर रावतेंशी बोललो असल्याची माहिती महसूलमंत्री आणि उच्चाधिकार मंत्रिगटाचे प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी दिली. त्यामुळे शिवसेना-भाजपमधील वाद आणखीच चिघळण्याची चिन्हं आहेत.

मंत्रिगटाची स्थापना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी आणि इतर प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उच्चस्तरीय मंत्रिगटाची स्थापना केली आहे. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे या समितीचे प्रमुख असतील.

कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री सुभाष देशमुख, परिवहनमंत्री दिवाकर रावते समितीचे सदस्य असणार आहेत. उच्चस्तरीय मंत्रिगटानं सुकाणू समितीला चर्चेसाठी निमंत्रण दिलं आहे. तर सुकाणू समितीच्या सदस्यांनीही सरकारशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे.

संबंधित बातम्या

मंत्रिगटाबद्दल कल्पनाच नाही, रावतेंचा सरकारला घरचा आहेर

रावतेंना बैठकीसाठी मी स्वत: दोनवेळा फोन केला : चंद्रकांत पाटील

Nasik News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:sanjay raut attacks devendra fadnavis government over farmer strike issue
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

नाशिकमध्ये दुचाकीच्या भीषण अपघातात पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू
नाशिकमध्ये दुचाकीच्या भीषण अपघातात पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू

नाशिक : नाशिकमधल्या टाकळीरोडजवळ झालेल्या भीषण अपघातात पोलीस

करवाढीच्या मुद्द्यावरुन नाशिकमध्ये सेना-भाजप आमने-सामने
करवाढीच्या मुद्द्यावरुन नाशिकमध्ये सेना-भाजप आमने-सामने

नाशिक : करवाढीच्या मुद्द्यावरुन नाशिकमध्ये सेना-भाजप आज आमने-सामने

विजेच्या खांबावर काम करताना झटका, महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू
विजेच्या खांबावर काम करताना झटका, महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू

नाशिक : विजेच्या खांबावर काम करत असलेल्या महावितरणच्या एका

नाशिकच्या विकासासाठी 'इस्रो'चं पाऊल, देशातील पहिलं शहर
नाशिकच्या विकासासाठी 'इस्रो'चं पाऊल, देशातील पहिलं शहर

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी ‘इस्रो’नं आपल्या

मुंबई-पुण्यानंतर आता नाशिकमध्येही ‘व्हर्च्युअल गेम झोन’!
मुंबई-पुण्यानंतर आता नाशिकमध्येही ‘व्हर्च्युअल गेम झोन’!

नाशिक : नाशिकमधील गेम लव्हर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई,

नाशकात हॉटेल-पेट्रोलपंपांचे टॉयलेट्स महिलांसाठी मोफत
नाशकात हॉटेल-पेट्रोलपंपांचे टॉयलेट्स महिलांसाठी मोफत

नाशिक : सार्वजनिक शौचालयांअभावी होणारी महिलांची कुंचबना

फुगा गिळल्याने 8 महिन्याच्या बाळाचा मृत्यू
फुगा गिळल्याने 8 महिन्याच्या बाळाचा मृत्यू

नाशिक : लहान मुलांना तुम्ही फुगा खेळायला देत असाल तर हजार वेळा विचार

फेसबुकवरुन मैत्री, वर्षभर बलात्कार, व्हिडीओ शूट करुन ब्लॅकमेल
फेसबुकवरुन मैत्री, वर्षभर बलात्कार, व्हिडीओ शूट करुन ब्लॅकमेल

नाशिक : नाशिकमध्ये दिवसेंदिवस गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचं

सरकारी मालमत्तेच्या चोरीची परवानगी द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र
सरकारी मालमत्तेच्या चोरीची परवानगी द्या, शेतकऱ्याचं...

नाशिक : सरकारी मालमत्तेची चोरी करण्यासाठीचा परवाना मिळावा असा

सोनू, तू पोलिसांशी नीट बोल, नाशिकच्या चिमुकल्यांची गाण्यातून जनजागृती!
सोनू, तू पोलिसांशी नीट बोल, नाशिकच्या चिमुकल्यांची गाण्यातून...

नाशिक : सोशल मीडियावर सोनूचा धुमाकूळ सुरुच आहे. आरजे मलिष्कामुळे