सत्ता भाजपच्या मालकीची, आम्ही नावापुरते : संजय राऊत

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या अफवा ऐकतोय. खरंच होऊ द्या, मग बघू, असे संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut criticized BJP latest updates

नाशिक : सत्ता भाजपच्या मालकीची आहे, आम्ही नुसते नावाला सत्तेत आहोत, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. शिवाय, भाजप काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी शिवसेनेलाच टार्गेट करते. त्यामुळे भाजप हा आमचा मुख्य विरोधी पक्ष असल्याचेही ते म्हणाले.

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या अफवा ऐकतोय. खरंच होऊ द्या, मग बघू, असे म्हणत संजय राऊत पुढे म्हणाले, “लोकसभा विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. युती होवो किंवा न होवो, आम्ही तयारीत आहोत.”

संघटनात्मक बैठकींसाठी नाशिकमध्ये आलेल्या संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपावर टीका केली. शिवसेना भाजपचे संबंध विकोपाला गेलेले असताना मुख्यमंत्री आणि पवारांची खासगी भेट झाल्यावर प्रतिक्रिया देताना राऊतांनी, शरद पवारांसारखा जेष्ठ नेता ‘बालीश’पणाचं राजकारण करेल असं वाटत नाही, असा टोला लगावला.

“फेरीवाल्यांचा प्रश्न देशव्यापी आहे. शिवसेना योग्य वेळी बोलेल. देशात सर्वप्रथम फेरीवाल्यांच्या संदर्भातला आवाज बाळासाहेब ठाकरेंनीच उठवला होता. आताही जोपर्यंत मुख्यमंत्री पोलीसांचं संरक्षण देत नाही, तोपर्यंत महापालिका अतिक्रमण काढू शकत नाही.”, असे सांगत संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांसह मनसेवर निशाणा साधला.

“गो. रा. खैरनार शिवसेनेने सर्वांसमोर आणले.  शिवसेनेने गो. रा. खैरनारांना पाठिंबा दिल्यानेच मुंबईनं मोकळा श्वास घेतला होता.”, असे सांगायलाही राऊत विसरले नाहीत.

Nasik News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Sanjay Raut criticized BJP latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

नाशकात कारमध्येच गर्भलिंग निदान चाचणी केंद्र!
नाशकात कारमध्येच गर्भलिंग निदान चाचणी केंद्र!

नाशिक : नाशिकच्या सातपूरमध्ये एका कारमध्ये गर्भलिंग निदान चाचणी

नाशिकमध्ये जन्मलेल्या महिलेचं गुगल डूडल!
नाशिकमध्ये जन्मलेल्या महिलेचं गुगल डूडल!

मुंबई: नाशिकमध्ये जन्मलेल्या महिलेचा गुगलने यथोचित सन्मान केला

अधिकृत फेरीवाल्यांना हटवणं गैर: संजय राऊत
अधिकृत फेरीवाल्यांना हटवणं गैर: संजय राऊत

नाशिक: फेरीवाल्यांवरुन सुरु असलेल्या वादात आता शिवसेनेने उडी

‘भाजप सरकार हिंदूंना एकत्र करुन अल्पसंख्याकांमध्ये फूट पाडत आहे’
‘भाजप सरकार हिंदूंना एकत्र करुन अल्पसंख्याकांमध्ये फूट पाडत आहे’

नाशिक : पूर्वीचं सरकार हिंदूंमध्ये फूट पाडून अल्पसंख्याकांचं

नाशिक आणि निफाडचा पारा 10 अंश सेल्सिअसवर
नाशिक आणि निफाडचा पारा 10 अंश सेल्सिअसवर

नाशिक : हिवाळ्यात मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यभर थंडीचा जोर वाढला आहे.

राणे मंत्री होणार, अन् सरकारही स्थिर राहणार : गिरीश बापट
राणे मंत्री होणार, अन् सरकारही स्थिर राहणार : गिरीश बापट

नाशिक : नारायण राणे मंत्री होणारच असा पुनरुच्चार अन्न पुरवठा मंत्री

जमिनीवर बसून राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांशी संवाद
जमिनीवर बसून राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांशी संवाद

नाशिक : मुंबईतील मनसेच्या सात पैकी सहा नगरसेवकांनी पक्षाला

35 तोळे सोन्याची चोरी, एका वर्षाने तक्रार, 12 तासात चोर गजाआड
35 तोळे सोन्याची चोरी, एका वर्षाने तक्रार, 12 तासात चोर गजाआड

नाशिक : एक वर्षापूर्वी चोरीला गेलेलं 35 तोळे सोनं आणि 15 किलो चांदी

नाशिकमध्ये 30-40 शेतकऱ्यांना अन्नातून विषबाधा, एकाचा मृत्यू
नाशिकमध्ये 30-40 शेतकऱ्यांना अन्नातून विषबाधा, एकाचा मृत्यू

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीमध्ये 30 ते 40 शेतकऱ्यांना अन्नातून

समृद्धी महामार्ग आंदोलनाला राज ठाकरे पाठिंबा देणार?
समृद्धी महामार्ग आंदोलनाला राज ठाकरे पाठिंबा देणार?

नाशिक : समृद्धी महामार्ग विरोधात शेतकऱ्यांनी आता मनसे अध्यक्ष राज