शिक्षिकेवर सूड उगवण्यासाठी फेक फेसबुक अकाऊंट, विद्यार्थ्याचा प्रताप

शिक्षिकेवर सूड उगवण्यासाठी फेक फेसबुक अकाऊंट, विद्यार्थ्याचा प्रताप

नाशिक: शाळेत रागावणाऱ्या वर्गशिक्षिकेवर सूड उगवण्यासाठी विद्यार्थ्यानं चक्क बनावट फेसबुक अकाऊंट सुरू करून बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार नाशकात उघडकीस आला आहे. या घटनेमुळं नाशकातल्या शिक्षण वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, हा प्रताप करणाऱ्या विद्यार्थ्याविरोधात सायबर शाखेत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणातील तक्रारदार शिक्षिकेला तिच्या नावानं दोन फेसबुक अकाऊंट सुरू असल्याचं समजलं. दरम्यान, दुसऱ्या अकाऊंटवरून बदनामी होईल या आशायच्या कमेंट्स आणि चॅट मेसेज करण्यात आले होते. त्यामुळं शिक्षिकेनं लागलीच पोलीस ठाण्यात धाव घेतली.

प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपास सुरू केला असता, बनावट अकाऊंट बनवणारा शिक्षिकेचा माजी विद्यार्थी असल्याचं उघड झालं. वर्गात नेहमी शिक्षिका रागवत असे याच गोष्टीचा सूड घेण्यासाठी या विद्यार्थ्यांनं हे कृत्य केलं. दरम्यान, आयटी अॅक्टनुसार संबंधित विद्यार्थ्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

VIDEO:

नाशिक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV