टीव्हीचा रिमोट दिला नाही म्हणून नाशकात पतीकडून पत्नीची हत्या

टीव्हीचा रिमोट दिला नाही म्हणून नाशकात पतीकडून पत्नीची हत्या

नाशिक : टीव्हीचा रिमोट न दिल्याच्या रागातून पतीनं आपल्या पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमधून समोर आला आहे. सिडको परिसरातील दत्तनगरमध्ये आज पहाटे ही घटना घडली.

हत्या झालेल्या महिलेचं नाव शोभा मनवतकर असून आरोपी पती पांडुरंग मनवतवर फरार आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, या घटनेवेळी त्यांच्या तीन लहान मुली घरातच होत्या.

आरोपी पांडुरंग मनवतकर हा वॉचमन म्हणून नोकरी करतो. उशीरा घरी आल्यानं पांडुंरग आणि त्याची पत्नी शोभा यांच्यात वाद झाला. त्यानंतर घरात टीव्ही बघत असताना आरोपी पांडुरंग यानं पत्नी शोभाकडे रिमोट मागितला. मात्र शोभा यांनी नकार दिल्यानंतर या दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. याच रागातून पांडुरंग यानं डोक्यात दगड घालून पत्नीची हत्या केली.

दरम्यान, पांडुरंग मनवतकर हत्या करून झाला फरार असून, अंबड पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV