गळा दाबून पत्नीची हत्या, पोलिसांनी पतीच्या मुसक्या आवळल्या  

नाशिकमधील विहीतगाव येथे पतीनेच पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे.

गळा दाबून पत्नीची हत्या, पोलिसांनी पतीच्या मुसक्या आवळल्या  

नाशिक : नाशिकमधील विहीतगाव येथे पतीनेच पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. मृत महिलेचं नाव साक्षी हांडोरे असून तिचा पती उल्हास हांडोरे याला पोलिसांनी अटक केली आहे.

पती उल्हास हांडोरेनं चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. सध्या पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

साक्षी हांडोरेने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव तिच्या नवऱ्याने रचला होता. पण पोलीस तपासात तिची गळा दाबून हत्या झाल्याचं उघड झालं. ही हत्या तिच्या नवऱ्यानेच केल्याचं तपास समोर आलं.

याप्रकरणी उपनगर पोलीस स्टेशनमध्ये उल्हास हांडोरेसह त्यांच्या नातेवाईकांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

नाशिक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: the husband was arrested for killing his wife in nashik latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV