चोरट्यांनी मुंबई-मनमाड डिझेल पाईपलाईन फोडली

नाशिकमध्ये डिझेलची पाईपलाईन फुटल्यानं गेल्या नऊ तासपासून डिझेल पुरवठा ठप्प झाला आहे. मात्र ही पाईपलाईन चोरीच्या हेतूनं फोडण्यात आल्याचं आता समोर आलं आहे.

चोरट्यांनी मुंबई-मनमाड डिझेल पाईपलाईन फोडली

 

नाशिक : नाशिकमध्ये डिझेलची पाईपलाईन फुटल्यानं गेल्या नऊ तासपासून डिझेल पुरवठा ठप्प झाला आहे. मात्र ही पाईपलाईन चोरीच्या हेतूनं फोडण्यात आल्याचं आता समोर आलं आहे.

आज पहाटे निफाडपासून काही अंतरावर खानगावजवळ मुंबई-मनमाड डिझेल पाईपलाईन फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डिझेल गळती सुरु झाली. हे डिझेल शेतात आणि गोदावरीच्या नदीपात्रात पसरत असल्याची माहिती मिळते आहे.

मागील 6 तासांपासून इथं पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरु आहे. पण या दुरुस्तीसाठी पुढील 24 तास लागू शकतात. त्यामुळे तोवर डिझेल पुरवठा बंदच राहणार आहे.

दरम्यान, ही चोर नेमकी कशी केली गेली हे शोधण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे.

नाशिक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: The thieves broke the Mumbai-Manmad Diesel pipeline latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV