राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘टिंग्या’ आणि त्याच्या कुटुंबाचा संघर्ष!

राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘टिंग्या’ आणि त्याच्या कुटुंबाचा संघर्ष!

नाशिक: राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आणि त्याचे कुटुंबीय शेतात पाल टाकून वास्तव्य करतात. शेळ्या-मेंढ्या चरायला नेतात. असं तुम्हाला कुणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही.  पण हे खरं आहे. पाहा कोण आहे हा हिरो...

‘टिंग्या’ चित्रपटातून आपल्याला भेटलेला टिंग्या अर्थात शरद गोयेकर सध्या मेंढ्या हाकतो आहे. टिंग्या या चित्रपटात केलेल्या कामाबद्दल वयाच्या 11व्या वर्षी शरदला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. शरदला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असला तरी शरदचे कुटुंबीय आजही मेंढपाळाचं काम मोठ्या आनंदानं करतात.

50 मेंढ्या, 6 घोडे आणि कोंबड्या असा गोयेकरांच्या कुटुंब-कबिला आहे. टिंग्याचं कुटुंब मेंढपाळाचं काम करत असल्यानं कुटंबांना मान सन्मान मिळतो. परिसरातील लोकही कुटुंबाला सहकार्य करतात. शरद सध्या बारावीत शिकतो आहे. याशिवाय ‘बाब्या’ नावाच्या सिनेमात काम करतो आहे. ज्यात तो मेंढपाळाचा रोल करतो आहे. याशिवाय दिग्दर्शकाच्या भूमिकेतही तोच आहे.

अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना शरदनं या नव्या क्षेत्रात चमकदार कामगिरी केली. आणि पहिल्या फटक्यात राष्ट्रपती पुरस्कारावर नाव कोरलं. पण आजही शरद आणि त्याच्या कुटुंबाची नाळ जमिनीशी जुळलेली आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV