चीनच्या ऐतिहासिक शॉनहुवा गॅलरीमध्ये फडकला तिरंगा

चीनच्या ऐतिहासिक शॉनहुवा गॅलरीमध्ये फडकला तिरंगा

नाशिक : इतिहासात पहिल्यांदाच चीनच्या ऐतिहासिक शॉनहुवा गॅलरीमध्ये तिरंगा फडकला आहे. विशेष म्हणजे, या ऐतिहासिक वास्तूच्या गॅलरीत तिरंगा फडकण्याचा मान नाशिकचे सुप्रसिद्ध चित्रकार प्रफुल्ल सावंत यांच्यामुळं मिळाला आहे.

 

तब्बल 1700 वर्षांचा इतिहास लाभलेलेल्या चीनच्या शांघाईतली शॉनहुवा वर्ल्ड हेरिटेज गॅलरीत 8 एप्रिलपासून चीनच्या ध्वजासह भारताचा तिरंगाही मोठा दिमाखात फडकतो आहे. इतिहासात पहिल्यांदाच आपल्या तिरंग्याला हा मान मिळवून असून, हा मान नाशिकचे जगप्रसिद्ध चित्रकार प्रफुल्ल सावंत यांच्यामुळे मिळाला.

 

प्रफुल्ल सावंत यांच्या कुंचल्यांनी साकारलेल्या अप्रतिम कलाकृतींचं प्रदर्शन शॉनहुवा गॅलरीत भरवण्यात आलं आहे.  प्रफुल्ल सावंत यांच्या कलेसोबतच, त्यांच्या मायदेशाच्या सन्मानासाठी गॅलरीवर 8 मेपर्यंत तिरंगा फडकवण्यात येणार आहे.

 

प्रफुल्ल सावंत हे जलरंगातून साकारलेल्या चित्रांसाठी ओळखले जातात. त्यांच्या चित्रातील जिवंतपणा चीनला चांगलाच भावला. म्हणूनच शॉनहुवा गॅलरीत सोलो प्रदर्शन भरवण्याची संधी प्रफुल्ल सावंत यांना देण्यात आली.

 

भारताशी नेहमीच खुसपट काढणारा देश अशी चीनची ओळख. मात्र कलेला देशांच्या सीमांचं बंधन नसतं असं म्हणतात. प्रफुल्ल सावंत यांना शॉनहुवा गॅलरीत प्रदर्शन भरवण्याची मिळालेली संधी, आणि गॅलरीवर फडकणारा तिरंगा हे त्याचंच द्योतक म्हणायला हवं.

 

 

First Published: Friday, 21 April 2017 10:32 PM

Related Stories

नाशिकचं 'सुला विनीयार्ड्स' ऊर्जानिर्मितीत स्वयंपूर्ण
नाशिकचं 'सुला विनीयार्ड्स'...

नाशिक : नाशिकला ‘वाईन कॅपिटल ऑफ इंडिया’ची ओळख देणारं ‘सुला

शिवसेना मोस्ट कन्फ्युज पार्टी, तर मुख्यमंत्री कॉपी कॅट, सुप्रीय सुळेंची टीका
शिवसेना मोस्ट कन्फ्युज पार्टी, तर...

नाशिक : शिवसेना ही मोस्ट कन्फ्युज पार्टी आहे. तर महाराष्ट्राचे

लोकांनी दारु प्यायची की नाही हे ठरवणारं न्यायालय कोण? : राऊत
लोकांनी दारु प्यायची की नाही हे...

मुंबई : महामार्गांवरील दारुची दुकानं हटवण्याच्या न्यायालयाच्या

फडणीस घोटाळ्याची ईडीकडून चौकशी सुरु
फडणीस घोटाळ्याची ईडीकडून चौकशी सुरु

नाशिक : नाशिकसह महाराष्ट्रात गाजलेल्या फडणीस घोटाळ्याची आता

शेकडो लोकांची फसवणूक करणारा विनय फडणीस मुंबईतून अटक
शेकडो लोकांची फसवणूक करणारा विनय...

नाशिक : फडणीस ग्रुपचा सूत्रधार विनय फडणीसला मुंबईतील विक्रोळीतून

समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना नोटीस
समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या...

नाशिक : शेतकऱ्यांनी नाशिक जिल्ह्यातल्या प्रस्तावित मुंबई-नागपूर

संघर्षयात्रेदरम्यान दोन शेतकऱ्यांचा सरकारला आत्महत्येचा इशारा
संघर्षयात्रेदरम्यान दोन...

नाशिक: संघर्षयात्रेदरम्यान नाशिकमधील पिंपळगाव बसवंत येथील सभेत

नाशिकमध्ये पुन्हा जळीतकांड, दोन चारचाकी जळून खाक
नाशिकमध्ये पुन्हा जळीतकांड, दोन...

नाशिक: नाशिकमध्ये पुन्हा एकदा गाड्या पेटवण्याची घटना समोर येते आहे.

पुणे विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका रद्दीत, पेपर न तपासताच विद्यार्थ्यांना गुण?
पुणे विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका...

नाशिक : तुम्ही पुणे विद्यापीठातून शिक्षण घेतलं असेल तर तुमच्या

नाशिकमध्ये 25 वर्षीय शेतकऱ्याची शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या
नाशिकमध्ये 25 वर्षीय शेतकऱ्याची...

मनमाड : नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून 25 वर्षीय तरुण