‘एबीपी माझा’ इम्पॅक्ट, नाशकात मानवी तस्करी प्रकरणी 2 जणांना अटक

एबीपी माझाच्या बातमीनंतर बांग्लादेशमधून भारतात वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींची तस्करी केल्याप्रकरणी दोनजणांना अटक करण्यात आली आहे.

‘एबीपी माझा’ इम्पॅक्ट, नाशकात मानवी तस्करी प्रकरणी 2 जणांना अटक

नाशिक : बांग्लादेशमधून भारतात वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींची तस्करी केल्याप्रकरणी दोनजणांना अटक करण्यात आली आहे. एबीपी माझाच्या बातमीनंतर सिन्नर पोलिसांनी दोघांना आज पहाटे अटक केली.

बांग्लादेशमधील दलाल 14-15 वर्षांच्या मुलींना नोकरीच्या निमित्तानं भारतात आणून, त्यांना वेश्या व्यवसायात ढकलत असल्याची, बातमी बुधवारी एबीपी माझानं पुराव्यानिशी दाखवली होती. यावेळी अल्पवयीन मुलींना हेरून त्यांना बेकायदेशीर सीमेवरून भारतात कसं आणलं जातं, याचा पर्दाफाश केला होता.

या अल्पवयीन मुलींची रेड लाईट परिसरात ने-आण कशी केली जाते? याचे खुलासे स्वतः बांग्लादेशहून वेश्या व्यवसायासाठी भारतात पाठवलेल्य़ा सलमानं केले होते. यानंतर सिन्नर पोलिसांनी महिला दलालांसह सात जणांवर मानवी तस्करीप्रकरणी गुन्हे दाखल केले होते.

यातील दोन आरोपींना आज पहाटे चारच्या दरम्यान विशाल गंगावणे आणि सोनू देशमुख या दोघांना अटक करण्यात आली.

संबंधित बातम्या

बांगलादेशहून फसवलेल्या तरुणींचा वेश्या व्यवसायासाठी वापर

नाशिक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: nashik-human-trafficking-from-bangladesh-sold-for-sex-racket-latest-update-489522
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV