समृद्धी महामार्ग आंदोलनाला राज ठाकरे पाठिंबा देणार?

10 नोव्हेंबरला नाशिकच्या दौऱ्यावर असलेले राज ठाकरे राज्यातल्या समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना भेटणार आहेत.

समृद्धी महामार्ग आंदोलनाला राज ठाकरे पाठिंबा देणार?

नाशिक : समृद्धी महामार्ग विरोधात शेतकऱ्यांनी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना साद घालण्याचा निर्णय घेतला आहे. 10 नोव्हेंबरला नाशिकच्या दौऱ्यावर असलेले राज ठाकरे राज्यातल्या समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना भेटणार आहेत.

सरकार कायदा तुडवून समद्धी महामार्गासाठी जमिनी हस्तांतरण करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे. याविरोधात शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलनही पुकारलं होतं. आता या आंदोलनात राज ठाकरेंनी उतरावं असं साकडं भेटीदरम्यान त्यांना घालण्यात येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून फेरीवाल्यांविरोधात रान उठवणारी मनसे समृद्धी महामार्गाला विरोध करुन सरकारला जेरीस आणणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे फेरीवाल्यानंतर मनसेचं पुढचं टार्गेट थेट सरकारचं असणार का? याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांचा विरोध डावलून मोजणी सुरु केल्याने रोष व्यक्त केला जात आहे. मुंबई-नागपूर हा समृद्धी महामार्ग राज्य सरकारचा महत्त्वाकांशी प्रकल्प आहे. या महामार्गासाठी सरकारने जमीन संपादन करण्यास सुरुवात केली. पण कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय हे संपादन होत असल्याचा दावा प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.

 • जमीन
  एकूण वन जमीन 399 हेक्टर
  एकूण शेत जमीन 17499 हेक्टर
  पडीक जमीन 2922 हेक्टर
  एकूण जमीन 20820 हेक्टर • खर्च 
  बांधकाम 24 हजार कोटी
  आर्थिक अधिभार 6 हजार कोटी
  भूसंपादन 13 हजार कोटी
  इतर 3 हजार कोटी
  एकूण खर्च 46 हजार कोटी


 

संबंधित बातम्या :

हेक्टरी 50 लाख रुपयांचा भाव, समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनाचे दर जाहीर

समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्यांना चॅप्टर नोटीस

VIDEO:  समृद्धी महामार्ग मोजणीला हिंसक वळण‘समृद्धी’ महामार्गामुळे शेतकऱ्यांचं वाटोळं होऊ देणार नाही: उद्धव ठाकरे


नाशिक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Will Raj Thackeray support the Samruddhi highway protest
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV