'काँग्रेसनं नाशिकमध्ये प्रचारासाठी कार्यकर्त्यांना पैसे देऊन आणलं'

'काँग्रेसनं नाशिकमध्ये प्रचारासाठी कार्यकर्त्यांना पैसे देऊन आणलं'

नाशिक: काँग्रेसनं नाशिकमध्ये पैसे देऊन प्रचारासाठी कार्यकर्त्यांना आणल्याचा आरोप होत आहे. तर दुसरीकडं रॅलीच्या पैशातच सभा करण्याचा आग्रह स्थानिक काँग्रेस नेत्यांनी धरल्याने सभेचा फज्जा उडाल्याची चर्चा रंगली आहे.

आज नाशिकमधील वडाळा गावात सह्याद्री हॉस्पिटलसमोर दुपारी 2.30 वाजता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रचार सभा आयोजित केली होती. या  प्राचार सभेसाठी महिलांना 150 ते 200 रुपये देतो असे सांगून महिलांना आणलं होतं.

मात्र प्रचाराला येऊनही आयोजकांनी पैसे देण्यास नकार दिल्यानं अनेक महिलांनी या सभेतून काढता पाय घेतला. माध्यमांशी बोलताना, सभेसाठी 150 ते 200 रुपये देतो असे सांगितलं होतं. पण आयोजकांनी आपला शब्द फिरवल्याचा आरोप या महिलांनी केला आहे. तसेच प्रचारासाठी सकाळपासून उपाशी-तपाशी फिरवतात असाही आरोप महिलांनी केला आहे.

तर दुसरीकडं रॅलीच्या पैशातच प्रचार सभा करण्याचा आग्रह स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी धरल्याने सभेचा फज्जा उडाल्याची चर्चा नाशिकमध्ये रंगली आहे.

संबंधित बातम्या: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या प्रचारसभेकडे नाशिककरांची पाठ!

 

First Published: Sunday, 19 February 2017 5:45 PM

Related Stories

नाशकात महिलेसाठी शौचालय, जिल्हाधिकारी-सीईओंचं श्रमदान
नाशकात महिलेसाठी शौचालय, जिल्हाधिकारी-सीईओंचं श्रमदान

नाशिक : नाशिकमध्ये एका विधवा महिलेला शौचालय बांधून देण्यासाठी चक्क

'विग घालून उंची वाढवणाऱ्या परीक्षार्थीचा व्हिडिओ व्हायरल का केला?'
'विग घालून उंची वाढवणाऱ्या परीक्षार्थीचा व्हिडिओ व्हायरल का केला?'

नाशिक : पोलिस भरती दरम्यान उंची वाढवण्यासाठी विग घालणाऱ्या

नाशकात कुल्फी खाल्ल्याने 25 ते 30 चिमुरड्यांना विषबाधा
नाशकात कुल्फी खाल्ल्याने 25 ते 30 चिमुरड्यांना विषबाधा

मनमाड : फेरीवाल्याकडे कुल्फी खाल्ल्यामुळे 25 ते 30 चिमुरड्यांना

पोलीस भरतीत उंचीसाठी केसांचा विग, तरुणाचा पर्दाफाश
पोलीस भरतीत उंचीसाठी केसांचा विग, तरुणाचा पर्दाफाश

नाशिक : पोलीस भरतीमध्ये निवड होण्यासाठी अनेकदा वेगवेगळ्या शकला

कचरा टाका, पैसे मिळवा, नाशिकच्या विद्यार्थ्यांचं अनोखं ATM
कचरा टाका, पैसे मिळवा, नाशिकच्या विद्यार्थ्यांचं अनोखं ATM

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाला साथ

काँग्रेसच्या मदतीने भुजबळांच्या गडावर शिवसेनेचा झेंडा
काँग्रेसच्या मदतीने भुजबळांच्या गडावर शिवसेनेचा झेंडा

नाशिक : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या

भरधाव कारच्या धडकेत नाशकात बारावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
भरधाव कारच्या धडकेत नाशकात बारावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

नाशिक : नाशिकमध्ये भरधाव अल्टो कारच्या धडकेत बारावीच्या

नाशिकमध्ये स्वाईन फ्लूनं सहा जणांचा मृत्यू
नाशिकमध्ये स्वाईन फ्लूनं सहा जणांचा मृत्यू

नाशिक : नाशिकमध्ये स्वाईन फ्लूनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे.

नाशिकमध्ये जगातील सर्वात उंच प्लॅस्टिक बॉटल मॉन्स्टर
नाशिकमध्ये जगातील सर्वात उंच प्लॅस्टिक बॉटल मॉन्स्टर

नाशिक : ‘पर्यावरण’ वाचवा हा संदेश देण्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा

मी ‘असा’ जिंकलो ! MPSC टॉपर भूषण अहिरेची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत
मी ‘असा’ जिंकलो ! MPSC टॉपर भूषण अहिरेची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2016 साली घेण्यात आलेल्या राज्य