नाशिकमध्ये तरुणाची धारदार शस्त्राने वार करुन हत्या

नाशिकमध्ये तरुणाची धारदार शस्त्राने वार करुन हत्या

नाशिक : पंचवटीमध्ये एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करत हत्या झाली आहे. दीपक अहिरे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. काल रात्री 11.15 च्या सुमारास घटना घडली.

काल मुख्य बाजार समितीच्या गेटवर अज्ञात इसमांनी दीपकवर धारदार शस्त्रांनी वार करुन त्याची हत्या केली. या हत्येनंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला. दीपकची हत्या करुन हल्लेखोर फरार झाले असून, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसात नाशिकमध्ये चोऱ्या आणि घरफोड्यांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. त्यातच आता ही हत्या झाल्याने, नाशिकमध्ये गुन्हेगारीने डोके वर काढलं असल्याचं बोललं जात आहे.

नाशिक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV