न्यूझीलंडचा कसोटी कर्णधार ब्रेन्डन मॅक्युलमनं अनोखा विक्रम रचला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
क्रिकेटच्या 139 वर्षांच्या इतिहासात एखाद्या संघाकडून सलग 100 कसोटी सामने खेळणारा मॅक्युलम पहिलाच क्रिकेटर ठरला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
वेलिंग्टनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटीत मॅक्युलमनं या विक्रमाची नोंद केली. 9 मार्च 2004 रोजी मॅक्युलमनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत पदार्पण केलं होतं. तेव्हापासून न्यूझीलंडनं खेळलेल्या प्रत्येक कसोटीत मॅक्युलमचा संघात समावेश होता.
वेलिंग्टनमध्ये आपल्या शंभराव्या कसोटीच्या पहिल्या डावात मॅक्युलम शून्यावरच बाद झाला.मात्र त्याआधी 99 कसोटी सामन्यांत मॅक्युलमनं 6 हजार 273 धावांचा रतीब घातला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतली दुसरी कसोटी 20 फेब्रुवारीपासून ख्राईस्टचर्चमध्ये खेळवली जाणार असून मॅक्युलमचा तो अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना असेल.
या मालिकेनंतर आपण निवृत्ती घेणार असल्याचं मॅक्युलमनं आधीच जाहीर केलं होतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
मॅक्युलमची कसोटी कारकिर्द : सामने 99, डाव - 172, धावा 6273, सर्वोच्च धावसंख्या - 302, सरासरी 38.48, स्ट्राईक रेट -63.71, शतकं -11, अर्धशतकं - 31, चौकार 751, षटकार -100