नांदूर-मध्यमेश्वरमध्ये महिनाभर अगोदरच परदेशी पाहुण्यांचं आगमन

नाशिक जिल्ह्यातील नांदूर- मध्यमेश्वरच्या काठांवर सध्या पक्षीप्रेमी या पाहुण्यांना पाहायला गर्दी करत आहेत.

नांदूर-मध्यमेश्वरमध्ये महिनाभर अगोदरच परदेशी पाहुण्यांचं आगमन

नाशिक : पक्षी सप्ताहाला आज पासून सुरुवात होत आहे. आनंदाची बाब म्हणजे सध्या परदेशी पाहुण्यांचं भारतात आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदूर- मध्यमेश्वरच्या काठांवर सध्या पक्षीप्रेमी या पाहुण्यांना पाहायला गर्दी करत आहेत.

हिवाळ्याची चाहुल लागताच नाशिक जिल्ह्यातील भरतपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदूर-मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात विदेशी पाहुण्यांचं म्हणजे पक्ष्यांचं आगमन होत असतं. मात्र यंदा हे पाहुणे तब्बल महिनाभर आधिच मुक्कामी आले आहेत. सध्या काही पक्षी येण्यास सुरुवात झाली आहे.

नांदूर-मध्यमेश्वर येथील धरणाच्या पाणथळ भागात या पक्षांसाठी पोषक वातावरण आणि आवश्यक असलेलं खाद्य म्हणजेच शेवाळ, कीटक, मासे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. हे परदेशी पाहुणे महिनाभर आधीच आल्यामुळे पक्षीप्रेमींनाही सुखद धक्का बसला आहे.

युरोप, सायबेरिया, उत्तर अमेरिका आणि आशियाई देशांतून हे पक्षी तर येथे येतातच. शिवाय देशी पक्षांची संख्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. या ठिकाणी थापाट्या, गढवाल, तरंग पक्षी, कॉमन पोचर्ड, भिवई बदक, चक्रांग पक्षी, ऑस्प्रे, पेटेंड स्टोर्क, कॉमन क्रेन, फ्लेमिंगो, ईगल, स्पून बिल, स्पोटेड ईगल असे विविध प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात.

काही पक्ष मस्त आकाशात घिरट्या घालतात, तर काही बदक आपलं खाद्य शोधण्यासाठी चक्क शिरसासन करताना आढळतात. विविध पक्षी आणि निसर्गरम्य वातावरण येथे असल्याने पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काही जण न चुकता येतात तर काही प्रथमच पक्षी निरिक्षणासाठी येतात.

वनविभागाने या ठिकाणी पर्यटकांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत. येत्या काही दिवसात त्यात आणखी वाढ करण्यात येणार आहे. इथे येणाऱ्या विदेशी पाहुण्यांचा मुक्काम या ठिकाणी आणखी काही महिने राहणार असल्याने पक्षीप्रेमींसाठी ही पर्वणी ठरणार आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: foreign birds arrived in nandur madhmeshwar
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV