भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन फ्रीडम 251 आज लाँच करण्यात आला आहे. 500 रुपये किंमतीला हा स्मार्टफोन असेल असा अंदाज सुरुवातीला वर्तविण्यात येत होता. मात्र, मोबाइल प्रेमींना आश्चर्याचा धक्का देत कंपनीनं अवघ्या 251 रुपयांना हा स्मार्टफोन उपलब्ध करुन दिला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
या स्मार्टफोनच्या नावावरुनच समजतं की, हा सर्वात स्वस्त 3जी स्मार्टफोन असून ज्याची किंमत फक्त 251 रु. आहे. नोएडाच्या रिंगिंग बेल कंपनीनं हा स्मार्टफोन तयार केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
‘मेक इन इंडिया’, डिजिटल इंडिया या कार्यक्रमाच्या अंतर्गत या स्मार्टफोनची निर्मिती करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन उद्या सकाळी 6 ते 21 फेब्रुवारी रात्री 8 वाजेपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.
अँड्रॉईड 5.1 ऑपरेटिंग सिस्टम असणाऱ्या या स्मार्टफोनचा डिस्प्ले 4 इंच असणार आहे. ३जी कनेक्टिव्हीटी देखील यामध्ये मिळणार आहे. यामध्ये 1.3 गीगाहर्त्झ क्वॉड कोअर प्रोसेसर आहे. तर 1 जीबी रॅम आणि 8 जीबी इंटरनल मेमरीही आहे. तसेच 32 जीबी पर्यंत ही मेमरी वाढविताही येऊ शकते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
तसेच या स्मार्टफोनमध्ये 3.2 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे. तर 0.3 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.
या फोनमध्ये स्वच्छ भारत, वुमन सेफ्टी, व्हॉट्सअॅप आणि ट्विटर यासारखे अॅप पहिल्यापासूनच इंस्टॉल असतील.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
याची बॅटरी 1,450mAh क्षमता असणार आहे. तसेच फोनच्या सर्विससाठी देशभरात 650 केंद्र असणार आहे.
कंपनीच्या वेबसाइटवर 18 फेब्रुवारीपासून याची प्री-ऑर्डर नोंदणी करता येणार आहे.