करिश्मा कपूरने पैशांसाठी माझ्याशी लग्न केलं होतं, असा आरोप तिचा पती संजय कपूरने कोर्टात केला आहे. करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु त्यांचा घटस्फोट हा दोघांच्या नात्याप्रमाणे गुंतत चालला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
अभिनेत्री करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचा घटस्फोट हा बॉलिवूडमधला सर्वात महागडा घटस्फोट मानला जात आहे. संजयने घटस्फोटासाठी नवी याचिका दाखल करुन करिश्माने पैशांच्या लालसेपोटी लग्न केल्याचा आरोप केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
मागील वर्षी डिसेंबर महिन्यात संजय कपूरने घटस्फोटासंदर्भात नवी याचिका दाखल केली होती. घटस्फोटासाठी परस्पर सहमतीने निश्चित केलेली आश्वासनं करिश्माने पाळली नाहीत. करिश्माने पोटगीची रक्कमही वाढवली आहे. संजय कपूरने नुकतीच वांद्र्याच्या फॅमिली कोर्टात घटस्फोटाची आणखी एक नवी याचिका दाखल केली.
करिश्माने पैशांसाठी लग्न केलं होतं. करिश्मा आणि अभिषेक बच्चनच्या ब्रेकअपनंतर, 2003 मध्ये संजय आणि तिचं लग्न झालं होतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
लग्नाच्या 11 वर्षांनंतरही करिश्मा ना चांगली पत्नी बनली, ना चांगली सून आणि ना चांगली आई, असंही याचिकेत म्हटलं आहे.
माझ्याविरोधात करिश्मा मुलांचा वापर प्याद्यांसारखा करत आहे. जास्त पैशांची मागणी करत करिश्मा मुलांना माझ्या कुटुंबियांना भेटू देत नाही. करिश्माने समायरा आणि कियान यांना त्यांच्या आजारी आजोबांपासून दूर ठेवलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
नातवंडांना भेटण्याची त्यांची इच्छा अपूर्णच राहिली आणि सहा महिन्यांपूर्वी माझ्या वडिलांचं निधन झालं. करिश्माने मला डावलून करिअर निवडलं, असं संजय कपूरने याचिकेत म्हटलं आहे.