26 जानेवरीचं औचित्य साधून कोल्हापूरमध्ये या वर्षीही रिक्षा सौंदर्य स्पर्धा भरवण्यात आली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
सहा जिल्ह्यातील रिक्षा शौकिनांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन त्यांनी लाखो रुपये खर्चून तयार केलेल्या रिक्षांचं प्रदर्शन केलं
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
ना सौदर्य, ना आकार.... अशा रिक्षांना रिक्षा शौकिनांनी लाखो रुपये खर्चून रुपवान बनवलं आहे
6 जिल्ह्यातील सुंदर रिक्षांच्या स्पर्धा महाराष्ट्र रिक्षाचालक संघाच्या वतीने अर्धा शिवाजी पुतळा परिसरात प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून भरवली जाते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
मुंबई, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, सातारा यासह राज्यातील विविध जिल्ह्यातून स्पर्धक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये आठ रिक्षा मालकांनी 2 ते 3 लाख रुपये खर्चून सर्व सोयीनियुक्त बनवलेल्या रिक्षा सहभागी केल्या होत्या.
रिक्षात वातानुकुलीत, रिव्हर्स पॅमेरा, एलसीडी स्क्रीन, मोबाईल चार्जर, बल्ब, पाणी, दैनिके, घडय़ाळ, रेल्वे व एसटीचे वेळापत्रक, दिनदर्शिका, अत्यावश्यक सेवांचे फोन नंबर, प्रथमोपचार पेठी आदी सोयी-सुविधा केल्या आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
केवळ रिक्षा सजवून हि स्पर्धा थाबवली जात नाही, तर या स्पर्धेत अनखीन एक वैशिष्ट असते, ते म्हणजे रिक्षा चालक अत्यंत खुबीनं रिक्षा या दोन चाकावर पळवतात, तर काहींनी भरधाव रिव्हर्स ने कमाल केली.
काही रिक्षाचालकांनी एक किंवा दोन चाकांवर रिक्षा चालवून अनोखा रॅम्पवॉक केला
थोरांसह शहीद जवान व कोल्हापूर दर्शनचे फोटोही अंतरंगात लावले आहेत. याचबरोबर रिक्षाच्या बाह्यबाजूस स्टील गार्ड, आकर्षक विद्युत रोषणाई, रेडियम आणि पितळी सिम्बॉल आदींनी रिक्षाला सजवले आहे.