सात फुटांची लोखंडी सळई डोक्यात आरपार घुसूनही एक मजूर बचावल्याची आश्चर्यकारक घटना मुंबईत घडली आहे. मालाडच्या तानाजीनगरमधील एका कन्स्ट्रक्शन साईटवर 24 वर्षीय मोहम्मद गुड्डू सिमेंट एकत्र करण्याचं काम करत असताना हा प्रकार घडला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
चौथ्या मजल्यावरुन पडलेली एक लोखंडी सळई थेट त्याच्या डोक्यावर आदळली आणि त्याच्या कवटच्या आरपार घुसली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
या घटनेनंतर गुड्डूला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पाच तासांच्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी त्याला आश्चर्यकारकरित्या वाचवलं. महत्त्वाचं म्हणजे ही सळई डोक्याच्या आरपार घुसूनही गुड्डूच्या मेंदूची प्रमुख धमनीला कोणतंही नुकसान झालेलं नाही.
पण गुड्डूच्या शरीराच्या डाव्या भागाला पक्षाघात झाला आहे. पण तीन महिन्यात त्याच्या सुधारणा होईल, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. या घटनेनंतर गुड्डूच्या डोक्याच्या उजव्या बाजूला दुखापत झाली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
गुड्डूला तातडीने संजिवनी रुग्णालय आणि त्यानंतर सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सायन रुग्णालयात डॉ. बटुक दियोरा यांच्या नेतृत्त्वात डॉक्टरांच्या एका टीम त्याच्यावर शस्त्रक्रिया केली.
डॉक्टरांच्या माहितीनुसार, "गुड्डूला कमीत कमी दोन आठवडे रुग्णालयातच राहावं लागेल. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. पण त्याला पूर्णत: बरं होण्यासाठी तीन महिने लागू शकतात."