क्रेडिट कार्ड - पैशांच्या व्यवहारासाठी क्रेडिट कार्डऐवजी आता मोबाईलचाच वापर वाढू लागला आहे. फोन बिल भरण्यापासून ते अगदी पैसे ट्रान्सफर करण्यापर्यंत सर्व कामं मोबाईल करु लागला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
आयपॉड आणि MP3 प्लेयर - गेल्या दोन-तीन वर्षांपासून आयपॉड आणि MP3 प्लेयरची विक्री प्रचंड कमी झाली आहे. अधिकाधिक लोक व्हिडीओ पाहण्यासाठी, गाणी ऐकण्यासाठी मोबाईललाच प्राधान्य देतात. शिवाय, ब्लूटूथ, व्हॉट्सअॅपवरुन शेअरही करता येतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
डिजिटल कॅमेरा - हाय रिझॉल्युशन कॅमेरा असलेले अनेक मोबाईल आता बाजारत दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे डिजिटल कॅमेऱ्याची आता गरज काय? हा प्रश्न सहाजिक आहे आणि तसंच होताना दिसतं आहे. डिजिटल कॅमेरा हल्ली कुणीही वापरताना दिसत नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
अलार्म क्लॉक - मोबाईलमध्ये अलार्म असताना वेगळा अलार्म क्लॉक विकत घेण्याची गरज काय, असे म्हणत अलार्म क्लॉकला अनेकांनी बाय बाय केलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
वृत्तपत्र- मोबाईलवर सर्व बातम्या, देश-विदेशातील घडामोडी एका क्लिकवर मिळत असतील, तर भला छापील वृत्तपत्राची गरजच काय? शिवाय अनेक वृत्तपत्रांचे अॅपसुद्धा उपलब्ध आहेत.