यूएईमधील पीएलएल मॅचच्या दरम्यान, दोन पाकिस्तानी क्रिकेटर्समध्ये झालेल्या धक्काबुक्की सध्या बरीच चर्चेत आहे. ही घटना पाकिस्तान सुपर लीगमधील पेशावर जल्मी आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स या संघामध्ये खेळविण्यात आलेल्या सामन्यात घडली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
पाकिस्तान आंतरराष्ट्रीय क्रिकेट टीमसाठी खेळणाऱ्या स्टार खेळाडू भर मैदानातच एकमेकांना भिडले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
मॅचमध्ये ५ ओव्हरमध्ये वहाब रिहादच्या पहिल्याच बॉलवर अहमद शहजादनं एक जोरदार षटकार लगावला. पण त्यानंतरच्या दुसऱ्याच बॉलवर वहाब भन्नाट चेंडू टाकत अहमद शहजादला ‘क्लीन बोल्ड’ केलं. त्यानंतर दोन्ही खेळाडू एकमेकांच्या समोर आले.
त्यांच्यात झालेलं बोलणं आणि धक्काबु्क्की टीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळतं आहे. दोघांमध्ये शिवीगाळही झाली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
दोघांमध्ये झालेली शिवागाळ आणि धक्काबुक्कीनंतर टीम मधील खेळाडूंनी तात्काळ मध्यस्ती करीत दोघांना बाजूला केलं. अहमद शहजादनं 17 चेंडूत 21 धावा केल्या. हा सामना रियाज वहाबचा संघ टीम पेशावर जल्मीनं जिंकला.
या प्रकरणानंतर पाकिस्तानी क्रिकेट बोर्डानं दोघांना मोठा दंड सुनावला असू दोघांना चांगलंच सुनावलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
मॅच रेफरी रोशन महानामा यांनी शहजादच्य मॅच फीमधील 30 टक्के रक्कम आणि वहाबच्या मॅच फीमधील 40 टक्के कापली आहे.