बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या नीरजा सिनेमाने 64 व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला. सिनेमाला पुरस्कार मिळाल्यानंतर मुंबईत सक्सेस पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, टीम इंडियाचे माजी क्रिकेटर सुनील गावसकर, अभिनेत्री विद्या बालन यांच्यासह दिग्गजांनी हजेरी लावली.