भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
यातच आता अनुष्का शर्मा कुटुंबीयांसोबत मुंबई विमानतळावर दिसली. अनुष्का इटलीला जात असल्याची चर्चा आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
अनुष्का शर्मा तिच्या आई, बाबा आणि भावासोबत शुक्रवारी रात्री मुंबई विमानतळावर दिसली.
सूत्रांच्या माहितीनुसार अनुष्का इटलीला जात असून, तिथे विराटसोबत तिचं लग्न होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
महत्त्वाचं म्हणजे मुंबई विमानतळावर फक्त अनुष्का आणि तिचे कुटुंबीयच दिसले. परंतु विराट त्यांच्यासोबत नव्हता.
अनुष्काचे बाबा अजय कुमार शर्मा
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
अनुष्काची आई आशिमा शर्मा
अनुष्काचा भाऊ करणेश शर्मा
इटलीमध्ये 13 ते 15 डिसेंबर असे तीन दिवस विराट-अनुष्काचा लग्नसोहळा असेल. 13 डिसेंबरला संगीत, 14 डिसेंबरला हळद आणि 15 डिसेंबरला लग्नाचा मुख्य सोहळा असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, लग्नासाठी अनुष्का आणि विराट थेट इटलीला जाणार नाही. अनुष्काने शुक्रवारी रात्री मुंबईहून दुबईला उड्डाण केलं आहे. दुबईमध्ये लग्नाची खरेदी केल्यानंतर पुढील टप्पा सिंगापूर असेल.
सिंगापूरमध्ये एक दिवस थांबल्यानंतर दोघे लंडनला जाणार आहे. तिथून 12 डिसेंबरला ते इटलीला पोहोचतील.
दुसरीकडे 'विरानुष्का' इटलीमध्ये नाही, तर भारतात, तेही मुंबईतच विवाहबंधनात अडकण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. वांद्र्या्च्या फॅमिली कोर्टात जाऊन अनुष्काने स्वतः लग्नाच्या नोंदणीसाठी लागणारा फॉर्म आणल्याची माहिती आहे.
पाहुण्यांना लग्नाच्या पत्रिकाही वाटल्याचं सांगितलं जात आहे.