पिंपरीत दिव्यांगाशी लग्न केल्यास 1 लाखाचं अनुदान

पिंपरी-चिंचवडच्या महिला आणि बालकल्याण समितीच्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

पिंपरीत दिव्यांगाशी लग्न केल्यास 1 लाखाचं अनुदान

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधल्या दिव्यांगांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण यापुढे पिंपरी-चिंचवडमध्ये सुदृढ व्यक्तीनं दिव्यांगांशी विवाह केल्यास त्या जोडप्याला १ लाखाचं अनुदान मिळणार आहे.

पिंपरी-चिंचवडच्या महिला आणि बालकल्याण समितीच्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. शिवाय या निर्णयाचं दिव्यांगांच्या संघटनांनीदेखील स्वागत केलं आहे.

दिव्यांगांचं लग्न जुळवण्यात अडचणी येत असल्याचं समोर आल्यानं समितीनं हा निर्णय घेतला आहे. मात्र पालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय होणं अद्याप बाकी आहे.

VIDEO :संबंधित बातम्या :

दलित युवक-युवतीशी लग्न केल्यास अडीच लाख रुपये

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: 1 lakhs grant if a competent person is married to a disabled person latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV